लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रिया झाली होती. यामध्ये काही शिक्षकांनी बोगस कागदपत्रांचा आधार घेत ‘सेफ’जागेमध्ये बदली करून घेतली. शिक्षक तसेच संघटनांनी शिक्षण विभागागडे तक्रार केली. दरम्यान, यावर्षी पुन्हा बदली प्रक्रियेसंदर्भात शिक्षण विभागाने माहिती मागितल्याने मागील वर्षी बोगस कागदपत्र सादर केलेल्या शिक्षकांची चौकशी करण्याची मागणी अन्यायग्रस्त शिक्षकांनी केली आहे.बदली प्रक्रियेमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणासाठी जि.प.ने कमीत कमी ३० कि. मी. पेक्षाजास्त अंतर असेल तरच बदलीसाठी पात्रठरणार होते. यासाठी आॅनलाईन प्रक्रियेत माहिती टाकायची होती. काही शिक्षकांनी ‘गुगल मॅप’ऐवजी एसटी महामंडळाचा आधार घेतला. मंडळाकडून तसे प्रमाणपत्र घेऊन बदली केली.संवर्ग एक नुसार ५३ वर्षांवरील शिक्षकांना, विविध आजार, कुमारीका, पक्षघात आदी शिक्षकांना बदलीमध्ये सुट किंवा घराजवळील शाळा मिळणार होती.संवर्ग तीन नुसार अवघड क्षेत्रातील शिक्षकांना ज्यांची सेवा ३ वर्षे झाली आहे, अशांना सुट देण्यात येणार होती. मात्र यातही शिक्षकांनी बोगस कागदपत्रांचा आधार घेतला. दरम्यान, यावर्षी पुन्हा बदलीपात्र शिक्षकांची माहिती मागितली आहे. त्यामुळे मागील वर्षी अन्याय झालेल्या शिक्षकांनी रोष व्यक्त करत आहेत. बोगस कागदपत्र सादर करून मर्जीच्या जागा मिळविलेल्या शिक्षकांवर कारवाई करून पुढील बदली प्रक्रिया राबविण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.दिव्यांगचे प्रमाणपत्रही जोडलेशासन निर्णयानुसार जि. प. प्राथमिक शिक्षकांमध्ये ३ टक्के शिक्षकांची दिव्यांग म्हणून नेमणूक झाली आहे. मात्र अनेक शिक्षकांनी अपंगाचे प्रमाणपत्र मिळवून बदलीमध्ये सुट मिळवली. कागदपत्रांचा विचार केल्यास जिल्हा परिषदेमध्ये अपंग शिक्षकांचा टक्का वाढणार आहे. काही शिक्षकांनी डोळ्यांचा आजार झाल्याचे प्रमाणपत्र सादर केले.मागील वर्षी ३३ शिक्षकांविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील २१ शिक्षक दोषी आढळले. त्यांचे एक वेतनवाढ बंद केली. अशा शिक्षकांची अतिदुर्गम भागात बदली केली आहे.-दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि.प. चंद्रपूरसंवर्ग १ मधील अनेकांच्या कागदपत्रांची तपासणी झाली नाही. प्रशासनाने या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यास मोठा गैरप्रकार बाहेर येऊ शकतो.-अनिल अवसरे, सरचिटणीस, अ. म. प्राथमिक शिक्षक संघ
‘त्या’ शिक्षकांच्या प्रमाणपत्राची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:25 PM
मागील वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रिया झाली होती. यामध्ये काही शिक्षकांनी बोगस कागदपत्रांचा आधार घेत ‘सेफ’जागेमध्ये बदली करून घेतली.
ठळक मुद्देअन्यायग्रस्त शिक्षकांंची मागणी : बनावट प्रमाणपत्राद्वारे बदली केल्याचा आरोप