घुग्घुस : घुग्घुस येथील शुभम अपहरण व हत्या प्रकरणात आरोपीकडून फेकलेला मोबाइल मिळाला. याप्रकरणाची चौकशी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घुग्घुस पोलीस ठाण्यात पाच तास स्वत: केली. मात्र अजूनही हत्या का केली, याबाबत कोणत्याही प्रकारचे धागेदोरे गवसले नाही.
बुधवारी आरोपीच्या पोलीस कोठडीचा अंतिम दिवस असल्याने आजही पोलिसांनी कसून चौकशी केली.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आरोपीकडून चौकशी सुरू राहणार आहे. या प्रकरणी शुभमच्या मित्रांना मंगळवारी दुपारी २ वाजता बोलाविले आणि रात्रीपर्यंत बसवून ठेवले होते. त्यामुळे त्यांचीसुद्धा मानसिकता खराब होत आहे. पोलीस आरोपीकडून विचारपूस करीत असली तरी अजूनही घटना कशी व कशासाठी याचा उलगडा झाला नाही.