फोटो
बल्लारपूर : बसस्थानकात बसेसचे अवागमन होणाऱ्या दोन्ही गेटवर आत - बाहेर असे दिशादर्शक बोर्ड लावणे बसचालक, प्रवासी इतर वाहने सर्वांच्या सोयीचे आणि सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक ठरते. तशा प्रकारचे सूचक व दिशादर्शक बोर्ड अनेक स्थानकांवर ठळक अक्षरात लावलेले दिसतात. मात्र, बल्लारपूर बसस्थानकाच्या गेटवर तसे मार्गदर्शक बोर्ड नाहीत.
बल्लारपूर बसस्थानक हे महामार्गाला अगदी खेटून असून, बसेसच्या अवागमनाकरिता दोन्ही बाजूंनी दोन प्रशस्त गेट आहेत. स्थानकाला लागूनच असलेल्या मार्गावर लहान - मोठ्या वाहनांची रात्र - दिवस मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे स्थानक परिसरात सावधगिरीने सर्वत्र लक्ष देत चालावे लागते. अशा ठिकाणी रहदारीबाबत सावधता म्हणून बसस्थानकाच्या दोन्ही गेटच्या दोन्ही बाजूला ''आत'' तसेच ''बाहेर'' असे दिशादर्शक बोर्ड लावणे अत्यंत गरजेचे आहे. दिशादर्शक बोर्ड नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची भीती आहे. गेटवर दिशादर्शक बोर्ड ठळक अक्षरात लावणे गरजेचे आहे. संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी लोकांची मागणी आहे.
240921\img-20210924-wa0000.jpg
बल्लारपूर बसस्थानकाचे बस आवागमन गेटवर आत बाहेर सूचक बोर्ड नाही!
अपघाताची भिती