लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. या आजारातून कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा आजार मुलांमध्ये येण्यामागे आई-वडीलच जबाबदार असतात. परंतू, या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी सिकसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले.राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमातंर्गत १९ जून जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिनाचा कार्यक्रम सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. चे. मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कार्डिले, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिकलसेल आजार नियंत्रणाकरिता जनजागृती रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अमित प्रेमचंद, डॉ. बंडू रामटेके, प्रा. हेमंत वरघने आदी उपस्थित होते.डॉ. गहलोत पुढे म्हणाले, सिकलसेल आजार टाळण्यासाठी वाहक-वाहक व्यक्ती तसेच वाहकग्रस्त व्यक्तीमध्ये लग्न करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.समाजातील इतर व्यक्तींनासुद्धा सिकलसेल तपासणी करण्यास प्रोत्साहित करून या आजाराची माहिती जनसामान्यांना देऊन या आजाराच्या नियंत्रणाकरिता कार्य करण्याचे आवाहन जिल्हा सिकलसेल समन्वयक संतोष चात्रेशवार यांनी केले. तसेच सिकलसेल रुग्णांकरिता शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान डे-केअर सेंटरचे उद्घाटन तसेच गर्भजल परिक्षण करून आलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डे केअर तंत्रज्ञ अर्चना गावंडे, समुपदेशक भारती तितरे व संस्थेचे पर्यवेक्षक व स्वयंसेवक उपस्थित होते. संचालन जिल्हा सिकलसेल समन्वयक संतोष चात्रेशवार तर आभार समुपदेशक शेंदरे यांनी मानले.सिकलसेल आजाराची लक्षणेसिकलसेल रुग्णामध्ये वेळोवेळी हातपाय दुखणे, चक्कर येणे, नेहमी आजार पडणे, जंतुसंसर्ग होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराच्या रुग्णाने भरपूर पाणी प्यावे, नियमती आहार घ्यावा, नियमित फोलिक अॅसिड गोळ्यांचे सेवन करणे महत्त्वाचे असते. या आजाराच्या रुग्णांनी योग्य काळजी न घेतल्यास आजार पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार, आरोग्य तपासणी करणे व काळजी घेणे गरजेचे असते.
लग्नापूर्वीच सिकलसेलची तपासणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:00 PM
सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. या आजारातून कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा आजार मुलांमध्ये येण्यामागे आई-वडीलच जबाबदार असतात. परंतू, या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी सिकसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले.
ठळक मुद्देराजकुमार गहलोत : सिकलसेल आजार नियंत्रण दिनानिमित्त कार्यक्रम