लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वातावरणातील बदल, अस्वच्छता यामुळे दिवसेंदिवस हिवताप, डेंग्यु, मलेरिया, टायफाईड आदी रोगाने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे कीटकजन्य आजार नियंत्रणाकरिता जिल्ह्यातील एक हजार ६०८ गावात चार लाख ७४ हजार ९१९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७६ रुग्ण हिवताप, १५१ डेंग्यू, पाच जे. ई. या आजाराचे रुग्ण आढळून आले.जिल्ह्यात मागे काही दिवसांपूर्वी पडलेला संततधार पाऊस, सर्वत्र साचणारे पाणी, त्यामुळे मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात झाली आहे. दिवसा ऊन- पाऊस व सायंकाळी दमट वातावरणामुळे व्हायरल फ्ल्यूचा प्रकोप वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात मलेरिया, टायफाईड, सर्दी खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात २० सप्टेंबरपर्यंत रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एक हजार ६०८ गावांपैकी ३४ गावात हिवताप, डेंग्यू ३२, तर दोन गावात जे. ई. चे रुग्ण आढळून आले आहेत.आरोग्य विभागातर्फे राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाकीटक डासांची निर्मिती थांबविण्याकरिता सर्व्हेक्षणाचा उपक्रम राबवून घरातील पाणी साठवण्याची तपासणी करण्यात आली. दूषित आढळलेल्या पाणीसाठयामधे डास अळी नाशक द्रावण टाकण्यात आले. घरगुती पाणीसाठे रिकामे करफन आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. जैविक नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात कार्यरत ३६६ गप्पीमासे पैदास केंद्रातून २३ लाख ६६५ डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्याची कार्यवाही करण्यात आली. हिवताप, डेंग्यू प्रभावित क्षेत्रामधील ५७ गावात धुरफवारणीचा कार्यक्रम राबविण्यात आला. कीटकजन्य आजाराकरिता जनजागृतीच्या सभांचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागात रॅलीव्दारे जनजागृती, शाळा, महाविद्यालयातून आरोग्य प्रर्दशन आदी उपाययोजना करण्यात आली.रुग्णांनी करावयाच्या उपाययोजनाकिटकजन्य आजाराचे नियंत्रणासाठी डास वव्यक्तींचा?संपर्कटाळणे अत्यावश्यक आहे. डेंग्यू आजारांच्या डासांची एडीस डासांची मादी दिवसा चावते या डासांच्या शरीरावर, पंखांवर पांढर ठिपके असतात. मोत्याच्या मण्यांची माळ घातल्यासारखा हा डास दिसतो वकेवळदिवसाच चावाघेतो. डेंग्यू आजारात भरपूरपाणी पिणे लक्षणानुसार औषधोपचार घ्यावा, आराम करावा तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यांनी उपचार घ्यावा.अशी आहेत लक्षणेहिवताप व डेंग्यूच्या रोगांची लक्षणे सारखीच आहेत. त्यामध्ये थंडी वाजणे, अंग दुखणे, मोठ्या प्रमाणात येणारा ताप, शरीरावर येणारे पुरळ साधारणत: अशी लक्षणे आढळून येतात. मनुष्य शरिराच्या प्रतिकार क्षमतेनुसार आजाराची लक्षण कमी अधिक प्रमाणात आढळून येतात दोन्ही आजारांचे निदान व उपचार त्वरीत न झााल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते.असा होतो प्रसारहिवतापाचा प्रसार अनाफिलीस मादीपासून तर डेंग्यू आजाराचा प्रसार एडीस डासांच्या मादीपासून होतो. डासाची मादी अंडी देण्याकरिता पोषक म्हणून मनुष्याच्या रक्ताचे शोषण करते, हिवताप डेंग्यूया आजाराचे डास स्वच्छ व स्थिर पाण्यात अंडी घालतात. साठलेल पावसाचे पाणी, डबके, नदी ,नाले, तलाव, वापरात नसलेल्या विहिरी हौद, पाण्याच्या झााकण विरहित टाक्या, रांजण, मोठी भांडी, कुलर, व फुटके डब्बे, माठ, जुने टायर आदी ठिकाणी डास आपली अंडी घालतात. रुग्णांची शासकीय रुग्णालयात मोफत रक्त तपासणी करण्यात येत असून उपचार केला जातो.
पावणेपाच लाख रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:37 PM
वातावरणातील बदल, अस्वच्छता यामुळे दिवसेंदिवस हिवताप, डेंग्यु, मलेरिया, टायफाईड आदी रोगाने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे कीटकजन्य आजार नियंत्रणाकरिता जिल्ह्यातील एक हजार ६०८ गावात चार लाख ७४ हजार ९१९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७६ रुग्ण हिवताप, १५१ डेंग्यू, पाच जे. ई. या आजाराचे रुग्ण आढळून आले.
ठळक मुद्दे१६०८ गावात तपासणी : कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम