लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायगाव येथील वाचनकुटीचा उपक्रम प्रेरणादायी असून यातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होणार आहे. सोबतच हसतखेळत वाचन होत असल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडेल. हा उपक्रम जिल्ह्यातील इतर शाळांनी राबवून विद्यार्थांना वाचनाची आवड निर्माण करावी, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.पं.स. चंद्रपूर अंतर्गत बोर्डा केंद्रातील जि.प.प्राथमिक शाळा वायगाव येथे वाचनप्रेरणा दिनानिमित्त वाचनकुटीला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पं.स. सभापती वंदना पिंपळशेंडे, उपसभापती चंद्र्रकांत धोडरे, चंद्रपूर पं. स. संवर्ग विकास अधिकारी राजू आनंदपवार, गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर, केंद्रप्रमुख रामराव हरडे यांची उपस्थिती होती. वायगाव शाळेने अभिनव उपक्रमाअंतर्गत बांबू व गवतापासून वाचन कुटी उभारली आहे. यामध्ये विविध बालसाहित्यासह विविध प्रकारची पुस्तके, संतांचे विचार, सुविचार व वाचनाचे महत्त्व विशद करणारे फलक लावण्यात आले. विद्यार्थी या कुटीद्वारे शिक्षण घेतात. मुख्यकार्यकारी अधिकारी पापळकर यांनी शाळेच्या प्रेरणादायी उपक्रमाची मौलिकता सांगितली. पहिल्यांदाच अशी वाचनकुटी बघितल्याचे त्यांनी सांगितले. गावातील युवकांशी संवाद साधला. दहावी नंतरच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी वाचनालयाचा उपयोग करावा, अशा सूचनाही केल्या.मुख्याध्यापक जे. डी. पोटे, सहाय्यक शिक्षक संघर्ष कुंभारे यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थांमध्येही वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून लोकसहभागातून वाचन कुटी निर्माण करण्याचा संकल्प केला होता. तो पूर्ण झाला आहे.जि.प. अध्यक्ष भोंगळे, सीईओ पापळकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी यादव, संवर्ग विकास अधिकारी आनंदपवार आदींनी कुटीत बसून पुस्तकांचे वाचन केले. शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार मनोज डांगरे, पुरूषोत्तम पेंद्राम, संतोष करपते, सचिन पेंद्राम, सुर्यभान पेंद्राम, बिजेंद्र सोयाम, सरदार झाडे, दुधारा शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र गिरडकर, नंदाजी कोवे, निंबाळा शाळेचे शिक्षक राजेंद्र अनमदवार, सरू वेलादी, बागडे मुन्नी आत्राम, वैशाली कोवे आदींची उपस्थिती होती.
वायगाव येथील वाचनकुटीचा उपक्रम प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 9:56 PM
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायगाव येथील वाचनकुटीचा उपक्रम प्रेरणादायी असून यातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होणार आहे. सोबतच हसतखेळत वाचन होत असल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडेल. हा उपक्रम जिल्ह्यातील इतर शाळांनी राबवून विद्यार्थांना वाचनाची आवड निर्माण करावी, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.
ठळक मुद्देदेवराव भोंगळे : लोकसहभागातून निर्माण केली जि. प. शाळेत वाचनकुटी