शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

बाप्पाची मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:20 AM

मागील अनेक दिवसांपासून आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीत असलेल्या गणेशभक्तांनी गुरूवारी मंगलमय वातावरणात बाप्पाची प्रतिष्ठापना केली. मूर्ती खरेदी करण्यासाठी छोटा बाजार आणि हिंदी सिटी शाळेजवळील रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते.

ठळक मुद्देगणपती बाप्पा मोरया..: शहरातील रस्ते गणेशभक्तांनी फुलले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील अनेक दिवसांपासून आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीत असलेल्या गणेशभक्तांनी गुरूवारी मंगलमय वातावरणात बाप्पाची प्रतिष्ठापना केली. मूर्ती खरेदी करण्यासाठी छोटा बाजार आणि हिंदी सिटी शाळेजवळील रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते. जिल्ह्यात सर्वत्र हेच चित्र दिसून आले. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. गणेश भक्तीची आराधना दहा दिवस सुरू राहणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळांकडून धार्मिक व प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.यंदा हा उत्सव साजरा करण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून जिल्हाभरात जय्यत तयारी सुरू होती. मूर्तीकार महिनाभरापासूनच मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागले होते. गुरूवारी बाजारपेठेत गर्दी उसळण्याची शक्यता बघून अनेकांनी दोन दिवसांपासूनच गणेशमूर्ती विकत घेऊन घरी ठेवल्या होत्या. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच शहरातील हिंदी सीटी शाळेजवळ आणि छोटा बाजार चौकात गणेशमूर्र्तींची दुकाने लागली आहे. हिंदी सीटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यानच्या मार्गावर महानगरपालिकेकडून गणेशमूर्र्तींच्या दुकानांसाठी मंडप उभारून दिले होते. गुरूवारी सकाळपासूनच या ठिकाणी नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. हिंदी सिटी शाळेपासून जयंत टॉकीज मार्गापर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. सायंकाळी साडेसात वाजता वाजेपर्यंत गणेश मूर्तीची खरेदी करण्यासाठी हिंदी सीटी हायस्कूलच्या मागील परिसरात भक्तांची गर्दी कायम होती. ढोल ताशांच्या गजरात गणेश मंडळांनी रात्री उशीरापर्यंत मूर्तीची प्रतिष्ठापणा केली.हिंदी सीटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यान गर्दीच गर्दीआपल्या लाडक्या बाप्पाला अनेकांनी चारचाकी वाहन व आॅटोरिक्षातून घरी नेले. काहींनी दुचाकी आणल्या होत्या. दुचाकीवर मागे बसणाऱ्यांच्या हातात मूर्ती ठेवायचे, असे नियोजन होते. हिंदी सीटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यानच्या मार्गावर मूर्ती घेऊन दुचाकीवर बसताना अडचणीचे ठरत होते. ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्तेही वाहने घेऊन मूर्ती विकत घेण्यासाठी या परिसरात आले होते.मूर्तीच्या किमतीत ३० टक्क्याने वाढगणेश मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्याच्या किंमती वाढल्या. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तींच्या किंमतीमध्ये ३० टक्क्याने वाढ झाली. पीओपी मूर्तीवर बंदी आल्याने मातीच्या मूर्ती विकत घेण्याची मानसिकता गणेश भक्तांमध्ये तयार झाली. परिणामी विक्रीवर काही परिणाम झाला नाही. काही भक्तांनी तर दोन आठवड्यांपूर्वीच आॅर्डर देऊन ठेवली होती. पर्यावरणपूरक मूर्तींकडेच भक्तांचा कल आहे, अशी माहिती मूर्तीकारांनी दिली.पोलीस प्रशासन सज्जगुरूवारी रात्री उशीरापर्यंत जिल्ह्यात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. दरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही.कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक व इतर रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. बंदोबस्तासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, २१ पोलीस निरीक्षक, ११० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ४०० पुरुष पोलीस कर्मचारी व ३११ अकरा महिला पोलिस कर्मचारी याव्यतिरीक्त ६०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड जवानांनाही जिल्ह्यात विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.१० दिवस कार्यक्रमांची रेलचेलगणेशोत्सवात डिजेवर बंदी घातल्याने गणेश मंडळांमध्ये नाराजी आहे. परंतु सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या काही मंडळांनी शासनाच्या या आदेशाचे स्वागत केले. तर काही मंडळांमध्ये नाराजी कायम आहे. बदलत्या काळानुसार उत्सवाच्या स्वरूपात परिवर्तन केले पाहिजे, या हेतूने शेकडो मंडळांनी धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे यंदा नव्यानेच नियोजन केले. कुठलाही उत्सव मिरवणूक असो, डिजे असलाच पाहिजे, अशी धारणा होती. त्यामध्ये आता बदल झाल्याचे दिसून येत आहे. उत्सवादरम्यान सामाजिक संदेश देणारे देखावे व अन्य कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८