गजानन दादाजी मुत्यलवार (५९) रा. मूल असे फिर्यादीचे नाव आहे तर अरूण शंकर तोडेवार यांच्यावर मूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मूल येथील युवाशक्ती व्यायम शाळेजवळ असलेल्या अरूण शंकर तोडेवार यांच्याकडे २३ हजार ४८२ रूपये विजबिल थकित होते, विज बिल भरण्याबाबत नोटीस देवूनही ते वीज बिल भरण्यास टाळाटाळ करीत होते. दरम्यान महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन दादाजी मुत्यलवार यांनी बंटी खोब्रागडे आणि मनोज गोंगले यांना घेवून अरूण तोडेवार यांच्या घरी काही दिवसांपूर्वी गेले आणि विज बिल भरण्याची विनंती केली, मात्र तोडेवार यांनी नंतर भरतो म्हटले, यावरून वाद झाला आणि तोडेवार यांनी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन दादाजी मुत्यलवार, बंटी खोब्रागडे, मनोज गोंगले यांना अश्लिल शब्दात शिवीगाळ करून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणाची तक्रार गजानन मुत्यलवार यांनी मूल पोलीस स्टेशनला दिली. तक्रारीवरून मूल पोलिसांनी अरूण तोडेवार यांच्याविरूध्द ३५३, ३३२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.