शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

खोट्या दस्तऐवजाद्वारे भूखंडाची परस्पर विक्री

By admin | Published: April 30, 2017 12:34 AM

तळोधी (बा) टिचर कॉलनी, भडके लेआऊटमधील प्लॉट क्रमांक ११ व प्लॉट क्रमांक १३ या प्लॉटचे खोटे दस्तऐवज तयार करून परस्पर विक्री करण्यात आली.

महिलेसह दोन आरोपी : तळोधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलतळोधी (बा) : तळोधी (बा) टिचर कॉलनी, भडके लेआऊटमधील प्लॉट क्रमांक ११ व प्लॉट क्रमांक १३ या प्लॉटचे खोटे दस्तऐवज तयार करून परस्पर विक्री करण्यात आली. या प्रकरणी एक अज्ञात स्त्री व नागपूर येथील दिनेश शामराव मोहोगावकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून तळोधी (बा) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.१० वर्षांपूर्वी फिर्यादी वनिता शांताराम संतोषवार यांनी तळोधी (बा) येथील टीचर कॉलनीमध्ये प्लॉट क्रमांक ११ हा १७६ चौरस मीटर व प्लॉट क्रमांक १३ हा १६२.३७ चौरस मीटर खरेदी केले होते. त्यांनी या प्लॉटचे फेरफार घेऊन तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात नोंद केली होती. मात्र अज्ञात स्त्रीने व नागपूर येथील दिनेश मोहोगावकर याने वनिता संतोषवार यांचे खोटे दस्ताऐवज व आधारकार्ड तयार केले. संतोषवार यांना दुर्धर आजाराचा त्रास असल्यामुळे त्यांना पैशाची आवश्यकता असल्याचे आरोपींनी बनाव तयार केला. त्याद्वारे तळोधी (बा) येथील नयनकुमार शिवणकर यांना टीचर कॉलनीमधील प्लॉट क्रमांक ११ व प्लॉट क्रमांक १३ चे खोटे दस्तऐवज तयार करून आरोपीकडून दुय्यम निबंधक कार्यालयात विक्रीची नोंद करण्यात आली. शिवणकर यांनी दोन्ही प्लॉटचा फेरफार घेऊन तलाठी कार्यालयात नोंद केली. परंतु फिर्यादी वनिता संतोषवार आपल्या प्लॉटचा मालमत्ता कर भरणाकरिता तलाठी कार्यालयात गेल्या असता दोन्ही प्लॉटची परस्पर विक्री करण्यात आल्याचे त्यांना आढळून आले. त्या आशयाची तक्रार त्यांनी तळोधी (बा.) पोलीस ठाण्यामध्ये केली आहे. याप्रकरणी तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत पांढरे यांनी तपास करून अपराध क्रमांक ९२१/२०१७ नुसार आरोपी अज्ञात स्त्री व नागपूर येथील दिनेश शामराव मोहोगावकर याच्याविरूद्ध भादंवि कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत पांढरे व पीएसआय जितेंद्र ठाकूर करीत आहेत. (वार्ताहर)