चिमूर : शहरात पाणीपुरवठा योजनेच्या नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून ज्या प्रभागात पाणीपुरवठा नळाद्वारे होत नाही, अशाच ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून, पाइप टाकणे सुरू असताना, खोदलेली माती रस्त्यावर टाकली जात आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने, खोदलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर पावसाचे पाणी पडत असून, रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे या रस्त्यावरून आवागमन करणे कठीण झाले आहे.
शहराला नुकतीच ५१ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. त्या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करत आहे. नगरपरिषद प्रभागातील महाकाली नगरी, पोलीस स्टेशन मागील भाग साईधाम नगरी, माणिकनगर, दुर्गा मंदिर परिसर, श्रावस्तीनगर, भय्यू महाराज विद्यालय परिसर, तुकडोजी मुकबधिर विद्यालय परिसर, यापैकी काही प्रभागांत पाणीपुरवठ्याचे पाइप टाकून झाले, तर काही प्रभागांत पाइपलाइनसाठी अंतर्गत रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू आहे. खोदकाम करताना माती रस्त्यावर टाकली जाते. खोदकाम झाल्याबरोबर पाइप टाकून नाली बुजवत नाही. नाली बुजविली, तरी अर्धी माती रस्त्यावरच पडून राहते. मातीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या हा रस्ता चिखलमय झाला आहे.
220921\img-20210921-wa0228.jpg
शहरातील अंतर्गत रस्तावर पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते