चंद्रपूर : येथील हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी येथे भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विशेष आंतरराष्ट्रीय वेबिनार घेण्यात आले. वेबिनारला विशेष मार्गदर्शक म्हणून डॉ. रसिका तेलरांधे उपस्थित होत्या. यावेळी ‘ओवेरियन सिस्ट ॲन्ड इट्स होमियोपॅथिक ट्रीटमेंट’ या विषयावर दुबई येथून मार्गदर्शन केले. यामध्ये १०० शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. तेलरांधे यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. सतीश कोसलगे यांनी सर्व शिक्षकांना सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेतून आदर्श शिक्षक व शिक्षिका बनून आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. संचालन प्रा. स्वाती लाडे, तर आभार प्रा. स्नेहल पिंपळशेंडे यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रा. स्वाती लाडे, प्रा. उमेश तेलरांधे, प्रा. राजश्री लोढे यांनी प्रयत्न केले.
हायटेक फार्मसी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:32 AM