शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

उदासीनतेत अडकले सिंचन

By admin | Published: May 28, 2016 1:01 AM

शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन नवनवीन योजना राबविताना दिसत आहे.

खर्च कोट्यवधीने वाढला : उद्दिष्टाच्या निम्म्या हेक्टरवरही सिंचन नाहीरत्नाकर चटप नांदाफाटाशेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन नवनवीन योजना राबविताना दिसत आहे. कोरपना जिवती तालुक्यातही १९९० पासून विविध सिंचन प्रकल्पासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रकल्प पुर्णत्वास न आल्याने शेतजमिनी अद्यापही सिंचनापासून वंचित असल्याचे दिसते. शासनाने याआधी विविध समित्या नेमून अहवाल तयार केला. यात विदर्भ सिंचन मंडळ, अवर्षण प्रवण सेल, जलसंधारण असे अनेक उपक्रम या दोनही तालुक्यात राबविले. परंतु सिंचन क्षेत्र वाढण्याऐवजी सिंचन प्रकल्पावरचा खर्च मात्र कोट्यवधी रुपयांचा झाला आहे. कोरपना तालुक्यात ३० वर्षांपूर्वी अमलनाला व पकडीगुड्डम ही धरणे पूर्णत्वास आली. या दोन्ही प्रकल्पाची सिंचन क्षमता ७ हजार हेक्टर इतकी असताना पाटबंधारे विभागाचे उद्दिष्ट साध्य करता आले नाही. या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना न मिळता तालुक्यातील सिमेंट कंपन्यांच्या घशात गेले. त्यामुळे ५० टक्केही शेतकऱ्यांना याचा फायदा झाला नाही. हे विदारक सत्य पुढे आहे. या प्रकल्पांना ३० वर्ष पूर्ण होऊनसुद्धा लघुकेची कामे अपूर्ण असल्याचे दिसते. मुख्य कालवा वगळता इतर छोट्या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे तालुक्यातील लखमापूर, थुटरा, कुकुडसाथ, पिंपळगाव, वनसडी, पिपर्डा, बिबी, धामणगाव, लोणी, खिर्डी, वडगाव, इंजापूर, देवघाट, कुसड, आसन आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर अजूनही पाणी पोहोचले नाही. यामुळे अवर्षण व विदर्भातील सिंचनाचा अनुशेष जैसे थे आहे. मात्र उद्योगांकडून पाण्याचा मोठा उपसा आजही करण्यात येत असल्याने कंपन्याच याचा फायदा अधिक घेत आहे. याबरोबरच जिवती तालुक्यातही सिंचनाच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी मोठा गाजावाजा करीत शासनाने जलसंधारण सिंचन निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. २०१० मध्ये या कामाची सुरुवातही करण्यात आली. मात्र पाच वर्ष उलटूनसुद्धा शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले नाही आणि दुसरीकडे शेतजमिनीचा मोबदलाही मिळाला नसल्याची ओरड शेतकऱ्यांमध्ये आहे. जमिनीवर खोदकाम झाल्याने आता शेतकऱ्यांना शेतीही करता येत नाही.