शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

मूलमधील सिंचन क्षमतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:32 PM

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : महाराष्ट्र शासनाने सिंचन क्षमता वाढावी, यासाठी सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे मूल तालुक्यातील विविध विभागाअंतर्गत २७८ सिंचनाची कामे पूर्ण झाल्यामुळे ८०२ टी. सी. एम. सिंचन क्षमता वाढली आहे. परिणामी रब्बीचे क्षेत्र वाढण्यास विशेष मदत मिळणार आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार ...

ठळक मुद्दे२७८ कामे पूर्ण : शेतकऱ्यांना मिळाले वरदान

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : महाराष्ट्र शासनाने सिंचन क्षमता वाढावी, यासाठी सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे मूल तालुक्यातील विविध विभागाअंतर्गत २७८ सिंचनाची कामे पूर्ण झाल्यामुळे ८०२ टी. सी. एम. सिंचन क्षमता वाढली आहे. परिणामी रब्बीचे क्षेत्र वाढण्यास विशेष मदत मिळणार आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.ग्रामीण भागातील शेतकरी हा पुर्णत: शेती उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे शेती उद्योगाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सन २०१७-२०१८ वर्षात जलयुक्त शिवार या अभियानाला विशेष महत्व देत विविध विभागाअंतर्गत कामे मंजूर केली. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाद्वारे २२८ तर म. ग्रा. रो. ह. योजनेअंतर्गत ५४ अशी २८२ कामे प्रस्तावित केली. त्यापैकी २५१ कामे पूर्ण करण्यात आली आहे. पंचायत समिती मूल अंतर्गत १० कामे प्रस्तावित होती. त्यापैकी संपूर्ण कामे पूर्णत्वास आली आहेत. पाटबंधारे विभागाअंतर्गत ७ कामे प्रस्तावित होती त्यातील ६ कामे पूर्णत्वास आली. जिल्हा परिषद सिंचाई विभाग अंतर्गत सर्वच ५ कामे पूर्ण करण्यात आली. वनविभागातील १७ कामांपैकी केवळ सहा कामे पूर्ण करण्यात आली.अशी एकूण ३२१ कामे प्रस्तावित करण्यात आली. मात्र काही विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे काम पुर्णत्वास नेता आले नाही. कृषी विभाग, वनविभाग काही प्रमाणात कामे पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे कामाची पूर्तता ६८.६०४ टक्के पूर्ण झाल्याचे अहवालात नमूद आहे.सन २०१६-१७ या वर्षात महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे, ही योजना अंमलात आणली. या योजनेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना सिंचनाची क्षमता वाढविण्यास मदत झाल्याचे दिसून येते. मागील वर्षी २०३ शेततळे मूल तालुक्यात तयार करण्यात आले. या शेततळ्यामुळे मागील वर्षी १३५ टी. सी. एम. पाणी साठा निर्माण होऊन सिंचन क्षमता वाढण्यास मदत झाली. महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सिंचन क्षमता वाढविण्यासाठी विविध योजनेमार्फत सिंचनाची कामे करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. यात मूल तालुक्यात कोसंबी, चक कन्हाळगाव, उथळपेढ, करवन, मारोडा, सोमनाथ, डोंगरगाव, कोरंबी, चक घोसरी, चक बेंबाळ, बोरघाट, नांदगाव, या १२ गावात प्रामुख्याने कामे करण्यात आली. कृषी विभाग, पंचायत समिती, पाटबंधारे विभाग, जि. प. सिंचाई विभाग, वनविभाग आदी यंत्रणेकडून ३२१ प्रस्तावित कामांऐवजी २७८ कामे पूर्ण केल्याने ८०२ टी. सी. एम.क्षमता वाढली. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान शेतकºयांसाठी वरदान ठरले आहे. जनजागृतीसाठी तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहाणे यांनी प्रयत्न केले.