राजेश मडावी। लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत मागील तीन वर्षांत प्रस्तावित केलेली बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन व्याप्ती वाढली. शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगामातील पिकांना लाभ होत आहे. परंतु, २०१८-१९ वर्षातील १२ हजार ४५३ कामांची उद्दिष्ट्यपूर्ती प्रशासनाला करता आली नाही. ९ हजार ६४५ कामेच पूर्ण होऊ शकली. १ हजार ४९५ कामे अर्धवट राहिली आहेत.डोंगरहळदीतील कामे सर्वोत्तमपोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी या गावातील जलयुक्त शिवार अभियानची कामे सर्वोत्तम झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांच्या कौशल्यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले. परिणामी, नियोजनातील सर्वच कामे पूर्ण होऊ शकली. चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर आणि वरोरा तालुक्यातील पाचगाव, राजुरा तालुक्यातील उमरझरा येथील कामेही प्रेरणादायी आहेत. यातून जलसाठा वाढला. शेकडो शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच आता अन्य पिकेही घेऊ लागले आहेत.जलयुक्त शिवारकामेजलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जूने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध, के.टी. वेअरदुरुस्ती व नुतनीकरण, जलस्तोत्रातील गाळ काढणे, जलस्त्रोत बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे, नाले जोड आदी कामे १५ तालुक्यात घेण्यात आली.जलयुक्त शिवार अभियान २०१५-१६ पासून यशस्वीरित्या राबविल्या जात आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने सरकारने विशेष लक्ष दिले. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार निधी कमी पडू दिला नाही. त्यामुळे कामे झपाट्याने पूर्ण झाली.- संजय गजपुरेसदस्य, जि. प. पार्डीजलयुक्त शिवार अभियानची कामे कंत्राटदारांकडून करून घेण्यात आली नाही. त्यामुळे या कामांमध्ये गुणवत्ता नाही. नियम बाजुला ठेवण्यात आले. कामांच्या जागा चुकीच्या निवडण्यात आल्या. असा प्रकार संपूर्ण जिल्ह्यातच घडल्याचे दिसून आले.-रोशन ढोक,सदस्य, पं. स. चिमूर
‘जलयुक्त’ने वाढणार सिंचन व्याप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:51 PM
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत मागील तीन वर्षांत प्रस्तावित केलेली बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन व्याप्ती वाढली. शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगामातील पिकांना लाभ होत आहे.
ठळक मुद्देयंदा ९ हजार ६४५ हजार कामे पूर्ण : खरीप हंगामात होणार विविध पिकांना लाभ