भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पिके घेता यावीत, यासाठी रखडलेले सर्वच सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षमता वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडू पाच मोठे बंधारे पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून दिला.तालुक्यात धानची शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. सिंचनाची सोय म्हणुन वाघोली बुटी उपसा सिंचन, हरणघाट उपसा सिंचन योजना उभारण्यात आली. पण या योजनेचे पाणी काही मोजक्याच शेतकºयांनाच मिळतो. त्यामुळे सिंचनाची गंभीर समस्या तालुक्यातील शेतकºयांना सहन करावी लागत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिचडोह प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने बांधकाम वेगात सुरू आहे. पाटबंधारे विभागाकडून ३५ वर्षांपासून पाणी गळती होत असलेल्या मोलझरी तलावाच्या पाळीचे सिमेंट बांधकाम पुर्ण केले. सदर तलावातील पाणी नागाळा, महादवाडी, गोंडसावरी, फुलझरी येथील शेतकऱ्यांना मिळत आहे. तलावाच्या कामासाठी १ कोटी १३ लाखांचा निधी पाटबंधारे विभागाला देण्यात आला.यामुळे मोलझरी तलावातील पाण्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. ही कामे पूर्ण व्हावे, यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनवने, शाखा अभियंता सोनेकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुक्यात ५ मोठे बंधारे मंजूर करण्यात आले.यापैकी २ बंधाºयांच्या कामाला सुरूवात झाली. चिरोली येथे १ कोटी ९१ लाख, ताडाळा येथे पूल आणि बंधाºयासाठी १४ कोटी ९० लाख, चिमढा येथ े९ कोटी ९० लाख, नलेश्वर येथे पूल आणि बंधारा बांधण्यासाठी ६ कोटी, सिंतळा येथे पूल आणि बंधारा १७ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. यातील चिरोली आणि नलेश्वर येथील बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात झाली. या बंधाऱ्यातील पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याने दुबार पेरणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, अशी प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.कॅनल दुरूस्ती करावीवाघोली बुटी उपसा सिंचन, हरणघाट उपसा सिंचन योजना ही जुनी असल्यामुळे अनेक ठिकाणी पाळ फुटली आहे. त्यासोबतच मुख्य कॅनल नादुरूस्त असल्याने शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी पोहचत नाही. कॅनल दुरूस्त झाल्यास ही समस्या कायमची दूर होऊ शकते.
तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प लागले मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:01 PM
तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार पिके घेता यावीत, यासाठी रखडलेले सर्वच सिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षमता वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : सिंचन क्षमता वाढणार, पाटबंधारे विभागाला कोट्यवधींचा निधी