शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

जेवण, औषध वेळेवर मिळते का? जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णांची विचारपूस

By साईनाथ कुचनकार | Published: February 27, 2024 7:20 PM

जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला.

चंद्रपूर : जेवण, औषध वेळेवर मिळते का? डॉक्टर लक्ष देतात का? कोणता आजार आहे? असे अनेक प्रश्न जिल्हाधिकारी विनय गौंडा यांनी रुग्णांना विचारले. बल्लारपूर, राजुरा येथील रुग्णालयातील सोयी-सुविधांचा त्यांनी मंगळवारी, दि. २७ फेब्रुवारी रोजी आढावा घेतला.

जिल्ह्यातील नागरिकांना वेळेवर उपचार व स्थानिक स्तरावर उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व त्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बल्लारपूर व राजुरा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयांस भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयांतील उपलब्ध आरोग्य सोयी-सुविधांची पाहणी केली. 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी (बल्लारपूर) स्नेहल रहाटे, रवींद्र माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कळसकर, बल्लारपूरचे तहसीलदार ओमकार ठाकरे, राजुराचे तहसीलदार ओमप्रकाश गौंड आदी उपस्थित होते.

रुग्णांना विचारले हे प्रश्नजेवण वेळेवर मिळते का? कधी भरती झाले? कोणता आजार आहे? असे प्रश्न विचारून लवकर बरे व्हा, असा आशावाद व्यक्त केला. रुग्णांनीसुद्धा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे दिली. यावेळी त्यांनी बल्लारपूर व राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स व इंटर्न डॉक्टरांची उपलब्धता, मनुष्यबळ, औषधांचा साठा, उपलब्ध खाटा, डॉक्टरांसाठी निवासव्यवस्था, तसेच रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सुविधांची माहिती जाणून घेतली.

विविध विभागांची पाहणीजिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बल्लारपूर आणि राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभाग, क्ष-किरण विभाग, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, संसर्गजन्य रोग नियंत्रण कक्ष, रुग्ण तपासणी कक्ष, आयुष विभाग, अपघात विभाग स्त्री व पुरुष रुग्ण विभाग, बाल उपचार केंद्र, हिरकणी कक्ष, अलगीकरण कक्ष आदी विभागांस भेट देत आरोग्य व्यवस्था व सुविधांची पाहणी केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीhospitalहॉस्पिटल