मुंबईत बैठक : थकीत वेतन अदा करण्याचे आरोग्य राज्यमंत्र्यांचे आ्श्वासन
चंद्रपूर : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांचे थकीत वेतन अदा करण्याचे निर्देश आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांचे पाच महिण्यांपासून वेतन अदा थकित आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांचा प्रयत्न सुरु होता. आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी मुंबई मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रस्ताव पाठवून जानेवारी महिण्याच्या पहिला आठवड्यात कामगारांचे थकीत वेतन अदा करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव प्रकाश सुरवसे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते. कंत्राटी पध्दतीवर काम करणा-या कर्मचा-यांची कोरोना काळातील सेवा विसरता येणार नाही. असे असले तरी या कर्मचा-यांचा वेतनाचा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. पाच महिण्यांपासून येथील कर्मचा-यांचे वेतन थकीत आहे. जुन्या डिनने वेतनासंदर्भात प्रशासकीय मान्यता न घेतल्याने पगार रखडले असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.