चंद्रपूर : श्रावण महिन्यामध्ये बहुतांश जण सोमवारी तसेच शनिवारी उपवास करतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी साबुदाणा तसेच अन्य पदार्थांची निवड केली जाते. यामध्ये साबुदाण्याला अधिक पसंती असते. मात्र नेमक्या याच दिवसांमध्ये साबुदाण्याचे भाव वाढतात. यावर्षीही यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे.
उपवास म्हटलं की साबुदाणा आलाचं. साबुदाणा वडा, साबुदाण्याची खिचडी आपण नेहमीच खातो. आता श्रावण महिना सुरु झाला आहे. त्यामुळे प्रत्येक घराघरात साबुदाण्याला पसंती असते. मात्र महागाईमध्ये साबुदाण्याचे ही दर वाढले आहे.
बाॅक्स
उपवासाच्या पदार्थाचे दर (प्रति किलो)
भगर -००
साबुदाणा-००
बाॅख्स
उपवास आहे मग हे पदार्थ खा
उपवासाच्या दिवशी खाण्यासारखे काही आरोग्याला बरे असलेले पदार्थही आहेत. असे पदार्थ खाल्ल्यास वारंवार उपास करणाऱ्यांना ते त्रासदायक ठरणार नाहीत. नारळाचे पाणी, दूध, मसाला दूध, मिल्कशेक, फळे, खजूर, अंजीर, बेदाणे, नुसताच एखादा उकडलेला बटाटा किंवा रताळे, राजगिऱ्याचे लाडू वा चिक्की, शेंगदाण्याचा गूळ घालून केलेला किंवा शिंगाड्याचे पीठ व खजूर याचे लाडू हे पदार्थ उपवासासाठी चांगले.
बाॅक्स
साबुदाणा आरोग्याला हानिकारक
उपवासाच्या दिवशी साबुदाणा जास्त खाणे हे आरोग्याला हानिकारक आहे. साबुदाणा जास्त खाल्ल्यास त्याच्यातील कार्बोहायड्रेट जास्त असते.
साबुदाणा जास्त खाल्ल्याने वजन वाढते व लठ्ठपणा वाढतो.
बाॅक्स
दर का वाढले
मागील काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहे. त्याचा परिणाम इतरही साहित्यावर होत असून महागाई वाढत आहे. वाहतूक खर्चात भर पडल्याचा कारण व्यावसायिक देत आहे. सध्या साबुदाणा सह इतरही साहित्य मागील वर्षीच्या तुलनेमध्ये वाढले आहेत.