मात्र प्रत्येक वेळी लाॅकडाऊन करणे शक्य नाही. आता लसीकरण हा पर्याय शोधण्यात आला आहे. मात्र लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावर अर्धा तास थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. मात्र काही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. घाईगडबड करून ते घरी जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र लस घेतल्यानंतर अर्धा तास महत्त्वाचा असतो. असे न केल्यास जीवावरही बेतू शकते. त्यामुळे लस घेतल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांच्या निगराणीमध्ये अर्धा तास बसा, त्यानंतरच घरी जा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली. अनेकांचा यामुळे जीव गेला. मागील वर्षापासून आतापर्यंत तब्बल ८४ हजार ५५२ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. तर ८२ हजार २९५ नागरिकांनी यावर मात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासन तसेच प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, लसीकरण हा पर्याय सध्या प्रभावी ठरत आहे. प्रथम फ्रंट वर्कर त्यानंतर ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येत होते. दरम्यान, शासनाने अधिक व्याप्ती वाढवत १८ वर्षांवरील प्रत्येकांना लस देण्याची घोषणा केली. त्यानंतर लसीकरण सुरूही केले. मात्र लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे अनेकांना वेटिंगवर राहावे लागत आहे. दरम्यान, आता ३० वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. यासाठी लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे.
लस घेतल्यानंतर प्रत्येकांना केंद्रामध्ये अर्धा तास थांबण्यासंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र काही अतिउत्साही नागरिक लसीकरण झाल्याबरोबर केंद्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. लस घेतल्यानंतर शरीर लसीला साथ देते की नाही, कुणाला ॲलर्जी होते का हे तपासण्यासाठी केंद्रात अर्धा तास थांबणे गरजेचे असते. मात्र काही जण घरी जाण्याची घाई करतात. आरोग्य विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही घाई जीवावर बेतू शकते. लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीमध्ये अर्धा तास थांबा. यात आपलीच भलाई आहे.
बाॅक्स
आतापर्यंत झालेले लसीकरण-एकूण लसीकरण-
पहिला डोस-
दुसरा डोस-
एकूण लसीकरण केंद्र-
बाॅक्स
लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?
लस घेतल्यानंतर अर्धा तासात काही दुष्परिणाम जाणवतात का, ॲलर्जी तसेच शरीरात काही बदल होतात का, चक्कर येते का आदी समजू शकते. काही दुष्परिणाम जाणवल्यास केंद्रावर तत्काळ औषधोपचार मिळू शकतो. लसीची ॲलर्जी असलेल्यांमध्ये ॲनाफिलॅक्सिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास महत्त्वाचा असतो. त्यामुळे केंद्रावर थांबण्याचा कंटाळा न करता प्रत्येकाने लस घेतल्यानंतर अर्धा तास केंद्रात थांबून राहणे गरजेचे आहे.
बाॅक्स
लस हेच औषध
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लस हेच सध्या तरी प्रभावी माध्यम आहे. लस घेतल्यामुळे कोरोना झाला तरी त्याचा प्रभाव कमी असतो. त्यामुळे प्रत्येकांने न घाबरता लस घेतलीच पाहिजे. मात्र केंद्रावरून घरी जाण्याची घाई करू नये. लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीमध्ये राहावे. कोरोनापासून दूर राहायचे असेल तर कोरोनाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. लसीकरण झाले तरी मास्क, सॅनिटायझर लावणे तसेच वारंवार हात धुणे गरजेचे आहे.
कोट
प्रत्येक लसीकरण केंद्रामध्ये नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई न करता अर्धा तास केंद्रात बसावे. ही लस कोरोनापासून संरक्षणासाठी आहे. त्यामुळे लस घेतली तरी प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळावेत.
- निवृत्तीनाथ राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर