ब्रह्मपुरी : आजच्या धावपळीच्या युगात ग्रंथाच्या जवळ जायला वेळ नाही. या शास्त्राची खरी घडी डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी घातली. त्यासाठी त्यांनी पंचसूत्री सांगून ग्रंथालयातील ग्रंथ सर्वांसाठी मोकळे केले. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालय शास्त्रातील ग्रंथाची उपयोगिता वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ने. हि. शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रा. जी. एन. केला यांनी केले.
ते येथील ग्रंथालयात डॉ. रंगनाथन जयंती दिन कार्यक्रम व राष्ट्रीय ग्रंथपाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे होते तर प्रमुख उपस्थितीत मराठी विभागप्रमुख डॉ. धनराज खानोरकर, डॉ. युवराज मेश्राम उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. विनोद घोडमारे यांनी केले तर आभार खेमराज निनावे यांनी मानले.
120821\img-20210812-wa0025.jpg
ग्रंथालय