शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

भाकरीचा शोधच ठरला नम्रताचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:31 AM

मानवाला जगण्यासाठी दोन सांजेची भाकर गरजेची असते. याच भाकरीसाठी त्याला अनेक कष्ट उपसावे लागतात. कष्टातूनच दोन वेळची भ्रांत भागवली जाते.

ठळक मुद्देकुणाल व कृतिकाचा आधार हरपला

राजकुमार चुनारकर।ऑनलाईन लोकमतचिमूर : मानवाला जगण्यासाठी दोन सांजेची भाकर गरजेची असते. याच भाकरीसाठी त्याला अनेक कष्ट उपसावे लागतात. कष्टातूनच दोन वेळची भ्रांत भागवली जाते. याच भाकरीसाठी चिमूर तालुक्यातील नेरी गावातील नम्रता राजेंद्र पिसे घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे दोन सांजेच्या भाकरीच्या शोधात शेतावर मजुरीसाठी गेली. दरम्यान, याच दरम्यान झालेल्या वाघाच्या हल्ल्यात नम्रता पिसे या महिलेला आपला जीव गमवावा लागला. भाकरीचा शोधच तिच्यासाठी काळ ठरला.चिमूर तालुक्याचा परिसर हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागलेला असल्याने या गावात जंगली प्राण्यांचा नेहमी वावर असतो. त्यामुळे या गावात अनेकदा वन्यप्राणी येतात तर परिसरातील नागरिक सरपनासाठी किंवा गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता अनेकावर वाघासह अस्वल आदी प्राण्यांनी हल्ले करून जखमी केले. अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.चिमूरपासून १२ किमी अंतरावर असलेल्या नेरी येथील पेठ मोहल्यात नम्रता व राजेद्र पिसे कुणाल व कृतिका या आपल्या दोन अपत्यांसोबत राहत होते.घरची परिस्थिती हलाखीची असल्याने राजेंद्र दुसऱ्याच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता तर दोन मुलाचे शिक्षण व परिवाराचा खर्च एकट्या राजेंद्रवर येऊ नये, म्हणून नम्रता मिळेल त्या कामावर जायची.नेहमीप्रमाणे पती राजेंद्र सकाळी वाहन घेऊन चालकाच्या चाकरीवर गेला. नम्रता आपल्या घरची कामे आटपून व पाचव्या वर्गात शिकणारा कुणाल व तिसऱ्या वर्गात शिकणारी कृतिकाची शाळेची तयारी करून वॉर्डातील चार महिलांसोबत नेरी-चिमूर रोडवरील लांजेवार यांच्या शेतात कापूस वेचायला गेली.थोडा वेळ कापूस वेचत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने नम्रताला काही कळायच्या आतच हल्ला करून नम्रताच्या नरडीचा घोट घेतला.यामध्ये नम्रता गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय चिमूर येथे आणण्यात आले. मात्र गंभीर दुखापत असल्याने नागपूर येथे रेफर करण्यात आले. उपचारादरम्यान नम्रताचा मृत्यू झाला. नम्रताच्या अचानक जाण्याने कुणाल व कृतिका यांच्या डोक्यावरील मायेचा हात हिरावला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

टॅग्स :Tigerवाघ