घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : महाराष्ट्र शासनाने घोडाझरीला अभयारण्य म्हणून घोषित करून सीमाही निश्चित केल्या. मात्र या अभयारण्याची स्थिती 'जैसे थे' आहे. या संदर्भातील प्रक्रिया अद्यापही पुढे सरकली नाही. त्यामुळे आता वन्यप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाने ३१ जानेवारी २०१८ रोजी या आभयारण्यास मान्यता दिली आणि त्यानंतर लगेच अभयारण्याची स्थापना व सीमा निश्चित करण्यात आल्या. हे अभयारण्य नागभीड , तळोधी व चिमूर या तीन वनपरिक्षेत्रातील १५ हजार ३३३. ८८ हेक्टर क्षेत्रात विस्तारण्यात आले आहे.घोडाझरी हे नागभीड तालुक्यात येत असलेले व पूर्व विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. येथील विपूल वनसंपदा, नैसर्गिक साधन संपत्ती आणि पशुपक्ष्यांचा अधिवास लक्षात घेऊन राज्य शासनाने घोडाझरीला अभयारण्य म्हणून घोषित करून या अभयारण्याच्या सीमाही निश्चित केल्या आहेत.या सीमांकनानुसार उत्तर दिशेला रेंगातूर गावाची दक्षिण पश्चिम सीमा व वनखंड क्रमांक ४१ ची उत्तर पूर्व सीमा, पूर्वेस कुनघाडा, रेंगातूर, पेंढरी, कसर्ला, डोंगरगाव नवखळा, तिव्हर्ला तुकूम, कोदेपार , धामनगाव, धामनगाव चक व नागभीडची हद्द तसेच वनखंड क्रमांक ६०४ पी, ६३४, ६३५ पी, ८७ पी, ८५ या वनखंडाची सीमा. दक्षिणेस चिंधीचक, किटाळी चक,किटाळी तुकूम, हुमा, घोडाझरी, खडकी तुकूम, गोविंदपूर, सोनापूर व येनोली, धामनगाव व धामनगाव चक, कचेपार गावाची सीमा, घोडाझरी तलाव सीमा तसेच वनखंड क्रमांक ५५,६४,७१, ६७ पी, ७८ ची सीमा. पश्चिमेस काजळसर, अडेगाव, सारंगड, लाव्हारी, मदनगड, डोंगरगाव, महारमजरा, डोमा, चक जट्टेपार, चक लोहारा, कवडसी, दहेगाव, झरी, येरवा या गावांच्या सीमा तसेच वनखंड क्रमांक ३८, ३९ पी, ४५६ पी, ६१, ५०३, ४५५, ४७५, ४७४, ४६२, ४६३, ३२१, ४७४ पी, ४७८, ४८६ च्या सीमा ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. या बाबीस आता नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी होत असला तरी अभयारण्याची देखभाल करणारे वन्यजीव कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने काहीच हालचाली दिसत नाही.वन्यजीव कार्यालय स्थापनेला विलंबया अभयारण्याच्या देखभालीसाठी वन्यजीव कार्यालयाची निर्मिती करणे गरजेचे असले तरी आद्यापही या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली नाही. सध्या या अभयारण्याची देखभाल नागभीड, तळोधी व चिमूर ही प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालय करीत आहेत.
स्थापनेपासून घोडाझरी अभयारण्य ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:34 AM
महाराष्ट्र शासनाने घोडाझरीला अभयारण्य म्हणून घोषित करून सीमाही निश्चित केल्या. मात्र या अभयारण्याची स्थिती 'जैसे थे' आहे. या संदर्भातील प्रक्रिया अद्यापही पुढे सरकली नाही. त्यामुळे आता वन्यप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ठळक मुद्देवन्यप्रेमींमध्ये नाराजी : प्रक्रिया पुढे सरकलीच नाही