लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांची सभा पार पडली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन क्रांतीदिनी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.विठ्ठल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे, प्रमोद गोडघाटे उपस्थित होते. शेतकºयाच्या ज्वलंत प्रश्नाला घेवून ६ ते १२ मार्चला नाशिक ते मुंबई अशी तीस हजार शेतकºयांनी ‘पैदल लॉग मार्च’ काढला. त्यानंतर शासनाबरोबर झालेल्या चर्चेत किसान सभेच्या मागण्यांना मान्य केल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानुसार वनजमिनीची मालकी सहा महिन्यात देणार, कर्जमाफीकरिता २००१ पासून लाभ मिळणार, ३० जून २०१७ पर्यंतचे सर्व कर्ज माफ करणार, कृषी मुल्य आयोगावर किसान सभेचे दोन सदस्य घेणार, संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढवणार आदी मागण्यांचा समावेश होता. मात्र अद्यापही काही मागण्या पूर्ण न झाल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्टला शेतकºयांचे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, असे सभेत ठरविण्यात आले.यावेळी दामोधर गेडाम, मारोती उईके, हनमंतु तेलंग, कोंडूजी वरखडे, वामन पंधरे, आकाश आत्राम, सोनेराव मडावी, प्रवीण पाटील, बंटी गेडाम, अमोल लसंते, संतोष सोनटक्के, सुधाकर नैताम, भीमराव नांदूरकर, चेतन तावडे यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.
क्रांतीदिनी शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:15 PM