धाबा : दरवर्षी माघ शुद्ध तृतीयेला होणारे महात्मा कोंडय्या महाराजांचा जयंती महोत्सव याही वर्षी कोरोनाच्या नियमाचे
पालन करून मर्यादित भाविकांच्या उपस्थित साजरा केला जाणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष अमर बोडलावर व सचिव किशोर अगस्ती यांनी दिली.
१३ फेब्रुवारीला महाराजांची
पालखी धाबा गावातून काढण्यात येणार आहे. १४ फेब्रुवारीला विद्यमान आमदार सुभाष धोटे व शुभांगी धोटे यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ घटस्थापना करून करण्यात येईल. सायंकाळी महाराजांना अभिप्रेत असलेल्या अग्निकुंड प्रभावडीचा दिव्य कार्यक्रम होईल. १५ फेब्रुवारीला गोपाल काल्याद्वारे कार्यक्रमाची सांगता होईल. या महोस्तवात केवळ धार्मिक कार्यक्रम होईल. भजन प्रवचन कीर्तन याला स्थगिती दिली आहे. कोणतेही सार्वजनिक दुकाने व मनोरंजनाचे कार्यक्रम या महोत्सवात होणार नाही. कोणतेही महत्वाचे व्यक्ती आमंत्रित केले जाणार नाही. या दरम्यान मंदिरात येणाऱ्या भाविकांना कोरोनाच्या नियमाचे पालन करावे लागणार. तोंडाला मास्क व सॅनिटायझरशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मर्यादितच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत थाटात साजरा केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा संस्थानचे अध्यक्ष अमर बोडलावार, सचिव किशोर अगस्ती यांनी केली आहे.