चंद्रपूर : मोकाट, विकलांग, व आजारी जनावरांचा सांभाळ करणाऱ्या प्यार फाऊंडेशनला जेसीआय बल्लारपूर ऑर्बिट, ज्युनिअर जेसी विंगच्या पदाधिकारी व सदस्यांनी भेट दिली.यावेळी संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली. दरम्यान आर्बिटचे अनुपम भगत आणि डॉ. नैना भगत यांच्यातर्फे संस्थेला ऑपरेशन टेबल व डस्टबिन भेट देण्यात आली.यावेळी प्यार फाऊंडेशनचे संचालक डॉ. देवेन रापल्ली यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना संस्थेमध्ये कशा प्रकारे जनावरे दाखल होतात, उपचार कसा केला जातो, पालन पोषण, दुर्धर आजारापासून शस्त्रक्रिया कशी केली जाते, याबाबत माहिती दिली. यावेळी प्रोजेक्ट डायरेक्टर मुस्कान भगत, परी भगत यांनी जेसीआयबद्दलची माहिती दिली. तसेच भविष्यात संस्थेसाठी व्हॅलेंटिअर म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली. संचालन ज्युनिअर जेसी अध्यक्ष गौरी मार्कंडेवार तर आभार अर्थव भगत यांनी मानले. यावेळी निधी दिवसे, आर्यन मुथा, शेजमनी चारण्या, गौरव मार्कंडेवार, खुशी चवंडे, जेसीआय ऑर्बिटचे अध्यक्ष हितेश नाथवानी, सचिव विक्रम अरोरा, जगदीश चावंडे, सचिन साळवे, अजय मार्कंडेवार, विनोद एदलावार, रक्षा नाथवानी, विद्या दिवसे, ममता अरोरा, आनंद कवाडे आदी उपस्थित होते.
जेसीआय बल्लारपूर ऑर्बिट, ज्युनिअर जेसी विंगची प्यार फाऊंडेशनला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:35 AM