शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

जिल्हाधिकारी कार्यालयावर झाडू मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:55 PM

जिल्हा सामान्य रूग्णालयातील कंत्राटी कामगारांना चार महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तसेच अन्य सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करून प्रहार संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर झाडू मोर्चा काढला होता. कामगारांनी सरकारविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देसमस्यांकडे वेधले लक्ष : चार महिन्यांपासून वेतन नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा सामान्य रूग्णालयातील कंत्राटी कामगारांना चार महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तसेच अन्य सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करून प्रहार संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर झाडू मोर्चा काढला होता. कामगारांनी सरकारविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली.जिल्हा सामान्य रूग्णालयातील कामगारांना नियमानुसार वेतन दिले जात नाही. कामगार कायदा धाब्यावर बसवून अन्याय केला जात आहे. चार महिन्यांपासून वेतन न दिल्याने कुटुंब चालविण्याचा प्रश्न निर्माण झाला. महिन्याच्या सात तारखेच्या आत कधीच वेतन मिळत नाही. नवीन कंत्राटदाराकडे कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार सामावून घेतले नाही, आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा बुधवारी सातवा दिवस झाले. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. तातडीने न्याय दिला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे प्रवीण खोबरागडे, राष्ट्रीय मुस्लीम हक्क संघर्ष समितीचे मुस्ताक कुरेशी, फिरोज खान पठाण, घनशाम येरगुडे, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे संदीप देव, सुलभ खोब्रागडे, कामगार संघटनेचे सतीश खोब्रागडे, कांचन चिंचेकर, अमोल घोडमारे, सतीश येसांबरे, सागर हजारे, अमर राऊत, अंकित वाघमारे, रवी काळे, स्वप्नील शेंडे, किशोर मंडल,निशा साव, विश्रांती खोब्रागडे, भाग्यश्री मुधोळकर, शेवंता भालेराव, लता उईके, अश्विनी नोमूलवार, संतोषी उमरे,माया वांढरे, रामेश्वरी रगडे, मीना कोंतूमवार, रेखा दुधलकर, धर्मेंद्र शेंडे, अनिल कोयचाळे आदी सहभागी झाले होते.