लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा येथील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ जिवती, चिमुरात मोर्चा काढण्यात आला तर चंद्रपुरात निदर्शने देण्यात आले.जिवती : राजुरा येथील वसतिगृहातील अत्याचार प्रकरणाचा निषेध करीत नराधमांना फाशीच देण्यात यावी, संस्थाचालकांना अटक करावी, शाळेची मान्यता रद्द व्हावी व शोषित पीडित मुलींना न्याय मिळवून द्यावा, यासाठी जिवती तालुक्यातील आदिवासी समाजाच्या सर्व संघटनेच्या वतीने वीर बाबुराव शेडमाके चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला जि.प. सदस्य गोदरु पाटील जुमनाके, बाबुराव मडावी, निलकंठ कोरांगे, मेहबुब भाई शेख, भारत आत्राम, डॉ. अंकुश गोतावळे, भोजी आत्राम यांनी संबोधित केले. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी लक्ष्मण मंगाम, लिगोंराव सोयाम, गजानन जुमनाके, भिमराव जुमनाके, सोमू सिडाम, दादाराव टेकाम, सत्तरशाह कोटनाके, अमृत आत्राम, भोजराज कोरवते, सतलाबाई जुमनाके, कविता सोयाम, लिलाबाई वेट्टी व आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.चिमूर : येथील वंचित बहुजन आघाडी, भारिप, आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना व माना जमात समन्वय सामितीच्या वतीने मोर्चा काढून तहसील कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले व राजुरा प्रकरणाचा निषेध करण्यात आला. राजुरा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. यात दोषींना कडक शिक्षा द्यावी, बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांविरुध्द कडक कारवाई करावी, अशा मागण्या यावेळी रेटून धरल्या. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात माना जमात समन्वय समितीचे कार्याध्यक्ष अरविंद सांदेकर, आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना अध्यक्ष सुहांनद ढोक, भारिप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष निलकंठ शेंडे, तालुका अध्यक्ष अॅड. नितीन रामटेके, कुलदीप श्रीरामे, स्नेहदीप खोब्रागडे, रमेश गेडाम, श्रीदास राऊत, विनोद सोरदे, भाग्यवान नंदेश्वर, रामदास राऊत, शंकर नन्नावरे, अरविंद चौधरी, गोपाल गराटे, अमोल गजभिये, राधा नन्नावरे, वर्षा गायकवाड, बबिता गेडाम, पुष्पा राऊत व मोठया संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.चंद्रपुरात निदर्शनेचंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आदिवासींवर झालेल्या अत्याचार व अन्यायाच्या विरोधात जन विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो आदिवासींनी आज शुक्रवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. चंद्रपूर तालुक्यातील चोरगाव येथील आदिवासी बांधवाला शिकारीच्या संशयावरून वनविभागाच्या अधिकाºयांनी बेदम मारहाण केली. यासोबतच चंद्रपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील संतोष सुरपाम यांनाही व्याघ्र सुरक्षा दलाच्या कर्मचाºयांनी शिकारीच्या संशयावरून मारहाण केली. हा प्रकार आदिवासी बांधवांवर अन्याय करणारा आहे. यासोबतच राजुरा येथील आदिवासी मुलींवर अत्याचार करण्यात आला. या तीनही घटनांचा निषेध करण्यासाठी व दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी जन विकास सेनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला. या आंदोलनात जन विकास सेनेचे घनश्याम येरगुडे, धर्मेंद्र शेंडे, अनिल कोयचाळे, किशोर महाजन, दिनेश कंपू, निलेश पाझारे, राहुल दडमल, मनिषा बोबडे, निर्मला नगराळे, राजू वाडगुरे, जीवन कोटरंगे, आतिश आत्राम, लक्षपती येलेवार, अनिल रोडावर, रमेश मिलमिले, मारुती सुरपाम, शरद मोहुर्ले, संतोष मेश्राम, विजय शेडमाके, श्रीहरी सोयाम, प्रफुल बैरम, देवराव हटवार गोंडवाना गणतंत्र पार्टीचे धीरज शेडमाके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
जिवती व चिमुरात मोर्चा, चंद्रपुरात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 10:18 PM
राजुरा येथील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ जिवती, चिमुरात मोर्चा काढण्यात आला तर चंद्रपुरात निदर्शने देण्यात आले.
ठळक मुद्देदोषींवर कडक कारवाई करा : राजुरा अत्याचार प्रकरण