लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दोन महिन्यांपासून बंद असलेल्या एसटीला राज्य शासनाने जिल्हांतर्गत बस फेºया सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र प्रवाशीच येत नसल्यामुळे एसटीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊनपूर्वी चंद्रपूर विभागात दररोज ९० हजार कि.मी. प्रवास करणारी लालपरी आजघडीला जेमतेम ५ हजार कि.मी.च धावत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व दळणवळणांची साधणे बंद झाली. यामध्ये एसटीसुद्धा सुटली नाही. लॉकडाऊनमध्ये देशाची सर्व अर्थव्यवस्थाच ठप्प पडली. परिणामी एसटीलाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यातून मार्ग काढत राज्य शासनाने जिल्ह्यांतर्गत एसटीच्या फेऱ्यांना परवानगी दिली. यामाध्यमातून प्रवाशांची सेवा तसेच एसटीला नुकसानीतून बाहेर काढणे हे दोन पर्याय होते. दरम्यान, एसटी आपले कर्तव्य पार पाडत आहे. मात्र प्रवासीच बाहेर पडत नसल्यामुळे सुरू केलेल्या एसटीच्या फेऱ्याही बंद करण्याची वेळ सध्या महामंडळावर आली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यांतर्गत दररोज २१ बस सुरू आहे. प्रवासी वाढल्यास या बसच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. चंद्रपूर विभागात मंगळवारी २१ बसद्वारे १२१ फेऱ्या मारण्यात आल्या. यामध्ये ५ हजार ८८४ कि.मी.चा प्रवास एसटीने केला. मात्र प्रवाशांच्या तुलनेमध्ये अत्यल्प उत्पन्न मिळाल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. लॉकडाऊनपासून खासगी बस सेवा बंद आहे, असे असतानाही लालपरीला पाहिजे त्या प्रमाणात आजच्या घडीला प्रवासीच मिळत नसल्याचे चित्रआहे. लॉकडाऊनपूर्वी चंद्रपूर विभागामध्ये दररोज ९० हजार कि.मी. प्रवास करून आर्थिक उत्पन्न मिळविणारी बस लॉकडाऊनमध्ये ५ हजार कि.मी. प्रवास करीत आहे.मात्र यातही महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.कर्मचाऱ्यांना दिलासाराज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार एसटी कर्मचाºयांना विमा कवच म्हणून सानुग्रह सहाय्य ५० लाख रुपये अदा करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील मजुरांना राज्य सीमेवर सोडणे तसेच जिल्हांतर्गत वाहतूक करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्य परिवहन महामंडळाकडून बससेवा सुरु करण्यात आली आहे. एसटी कर्मचारी प्रवाशांना सेवा देण्यासाठी शासनाच्या मदतकार्यात रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यामुळे मदतकार्य करताना कोरोनाशी संबंध येऊन एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या सर्व प्रकरणी ५० लाख रकमेचे सानुग्रह सहाय्य काही अटींच्या अधीन राहून प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे काही प्रमाणात का, होईना एसटी महामंडळातील कर्मचारी, अधिकाºयांना दिलासा मिळाला आहे.प्रवाशांकडून अल्प प्रतिसादकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक दहशतीत आहे. त्यामुळे प्रवास करणे टाळत असल्यामुळे एसटीला प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. काही नागरिक कामानिमित्त बाहेर निघाले तर दुचाकी किंवा कारचा वापर करीत आहे. विशेष म्हणजे, प्रशासकीय कामे होत नसल्यामुळे ग्रामीण नागरिक शहरात येण्याची टाळत आहे.बसच्या स्वच्छतेवर अधिक भरकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जात आहे. लॉकडाऊनपूूर्वी आगारातून निघताना बसची स्वच्छता केली जायची. आता मात्र प्रत्येक फेऱ्यानंतर बसची स्वच्छता केली जात आहे. विशेष म्हणजे, सोशल डिस्टन्ससाठी बसमध्ये केवळ ५० टक्केच प्रवाशांना बसमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी ५० टक्के प्रवासी सु्द्धा सध्या बस मध्ये दिसत नाही.लॉकडाऊनपूर्वी चंद्रपूर विभागात एसटी ९० हजार कि.मी. प्रवास करीत होती. मात्र सध्या ५ हजार कि.मी. प्रवास केला जात आहे. आवश्यक असलेल्या ठिकाणी, प्रवासी संख्या, सोशल डिस्टन्स ठेवून बस सोडल्या जात आहे.- आर. एन. पाटील, विभागीय नियंत्रक, चंद्रपूर
९० हजार कि.मी.चा प्रवास ५ हजारावर थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:00 AM
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व दळणवळणांची साधणे बंद झाली. यामध्ये एसटीसुद्धा सुटली नाही. लॉकडाऊनमध्ये देशाची सर्व अर्थव्यवस्थाच ठप्प पडली. परिणामी एसटीलाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यातून मार्ग काढत राज्य शासनाने जिल्ह्यांतर्गत एसटीच्या फेऱ्यांना परवानगी दिली. यामाध्यमातून प्रवाशांची सेवा तसेच एसटीला नुकसानीतून बाहेर काढणे हे दोन पर्याय होते.
ठळक मुद्देलालपरी संकटात : जिल्ह्यांतर्गत दिवसातून केवळ २१ फेऱ्या