शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

लालपरीचा प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 5:00 AM

कोट्यवधी रुपयांचे नुकसान महामंडळाचे झाले आहे. दरम्यान, टप्प्याटण्याने देश अनलॉक करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात परराज्यातील प्रवासी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार बस सोडण्यात आल्या. त्यानंतर २२ मेपासून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र मर्यादित बसफेऱ्याच सुरू असल्याने व प्रवासी बसविण्यावर मर्यादा असल्याने एसटी महामंडळाचे जिल्ह्यात कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे परिवहन महामंडळाला ग्रहण : जून महिन्यात ८.५० कोटींचा घाटा

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे. आजघडीला महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करत लालपरी अवितरपणे सेवाभाव बाळगत प्रवाशांसाठी धावत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्पन्नात ८.५० कोटी रूपयांची घट झाली आहे.परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागात जवळपास २५० बस नियमितपणे धावतात. चंद्रपूर विभागात येणाºया चार आगारांच्या माध्यमातून लाखो प्रवाशांना सेवा देण्याचे काम लालपरी करते. २५० बसेसच्या जवळपास एक हजार फेºया दररोज एसटीच्या होतात. यातून पूर्वी दररोज ३० लाखांचे उत्पन्न होत होते.मार्च महिन्याच्या २३ तारखेपासून कोरोना संसर्गामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून आजपर्यंत हे लॉकडाऊन व कोरोना संसर्ग अविरत सुरूच आहे. लॉकडाऊन काळात पहिल्यांदाच तब्बल तीन महिने एसटी जागेवरच थांबली.परिणामी कोट्यवधी रुपयांचे नुकसान महामंडळाचे झाले आहे. दरम्यान, टप्प्याटण्याने देश अनलॉक करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात परराज्यातील प्रवासी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार बस सोडण्यात आल्या. त्यानंतर २२ मेपासून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र मर्यादित बसफेऱ्याच सुरू असल्याने व प्रवासी बसविण्यावर मर्यादा असल्याने एसटी महामंडळाचे जिल्ह्यात कोट्यवधींचे नुकसान होत आहे. जून महिन्यात एरवी दररोज ३० लाखांचे उत्पन्न होत असताना यावेळी मात्र महिन्याकाठी केवळ ४५ लाखापर्यंतच उत्पन्न मिळू शकले. त्यामुळे जिल्ह्यात महामंडळाला जून महिन्यात ८.५० कोटींचे नुकसान सहन करावे लागले.२५० पैकी ६० बसेस रस्त्यावरचंद्रपूर जिल्ह्यात महामंडळाच्या जवळपास २५० बस असून त्यापैकी केवळ ६० बसेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. एरवी चंद्रपूर जिल्ह्यातील बसेस राज्याच्या कानाकोपऱ्यात धावत होत्या. परंतु, लॉकडाऊनमुळे सर्व सेवा विस्कळीत झाली आहे. केवळ जिल्ह्यांतर्गतच बसफेऱ्या सुरू आहेत. या ६० बसेसच्या माध्यमातून दररोज केवळ ३०८ फेऱ्या होत आहे.कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपातराज्यात लॉकडाऊनपासून बंद असलेली लालपरी २२ मेपासून जिल्ह्य अंतर्गत सुरू झाली. यामधे शासनाने अनेक निर्बंध घालून बस सुरू केली. त्यात ५० टक्के प्रवाशी वाहतुकीची परवानगी दिली आहे. मर्यादित बसफेऱ्या असल्याने दररोज ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच पाचारण करण्यात येत आहे. एसटी तोट्यात चालत असल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे ५० टक्के पगार देण्यात आले तर जून महिन्याचे तर वेतन अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी व त्यांचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात २५० बसेसपैकी केवळ ६० बसेसच्या माध्यमातून बससेवा दिली जात आहे. ५० टक्केच प्रवाशी बसविले जात असल्याने महिन्याकाठी महामंडळाला साडेआठ कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे.-आर.एन. पाटील, विभागीय नियंत्रक,एसटी महामंडळ, चंद्रपूर.

टॅग्स :state transportएसटी