शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

केवळ आठ महिन्यात रामनगर ठाण्यात बदलले सहा ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 5:00 AM

सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर टिकले नाही. हाके यांच्यानंतर रामनगरची धुरा फेब्रुवारी २०२१ मध्ये रोशन यादव यांच्याकडे देण्यात आली. मात्र मे महिन्यात त्यांची ब्रह्मपुरी येथे बदली करून कमलेश जयस्वाल यांच्याकडे सूत्रे देण्यात आली.

परिमल डोहणे लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सर्वात मोठे ठाणे म्हणून ओळख असलेल्या रामनगर ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या ठाणेदाराला गुन्हेगारांची ओळखपरेड होण्यापूर्वीच बदली करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठ महिन्यांचा विचार केल्यास आठ महिन्यात रामनगर ठाण्यात चक्क सहा ठाणेदारांची बदली झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येते. चंद्रपूर उपविभागांतर्गत चंद्रपूर शहर, रामनगर, घुग्घुस, दुर्गापूर, पडोली हे पोलीस स्टेशन येतात. यापैकी सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर टिकले नाही. हाके यांच्यानंतर रामनगरची धुरा फेब्रुवारी २०२१ मध्ये रोशन यादव यांच्याकडे देण्यात आली. मात्र मे महिन्यात त्यांची ब्रह्मपुरी येथे बदली करून कमलेश जयस्वाल यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. एक महिन्यातच जयस्वाल यांच्याकडून पदभार काढून त्यांना सायबर सेलमध्ये पाठवून प्रदीप शेवाळे यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली. परंतु, शेवाळेही यांना दीड महिन्याचा कालावधी होताच त्याची सावली तालुक्यातील पाथरी येथे बदली करून मधुकर गीते यांची नेमणूक करण्यात आली. गीते यांनी साडेतीन महिने कारभार सांभाळल्यानंतर त्यांची बढती नागपूर येथील लाचलुचपत विभागात करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जागी राजेश मुळे यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. मात्र संवेदनशील ठाणे म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात  ठाणेदार बदलत असल्याने गुन्हेगारी वाढत आहे.

ठाण्यात २५ च्यावर अधिकाऱ्यांची गरजचंद्रपूर उपविभागातील सर्वात मोठे ठाणे म्हणून रामनगरची ओळख आहे. तसेच हा संवेदनशील ठाणा म्हणून ओळखल्या जातो. सर्व शासकीय कार्यालय, रेल्वे स्टेशन, बसस्थानक याच ठाण्याच्या हद्दीत येतात. मंत्र्यांचे दौरे, बंदोबस्त आदी कामात पोलीस गुंतले असतात. या ठाण्यात २५ च्या जवळपास अधिकाऱ्यांची गरज असताना केवळ ८ ते १० अधिकारी कार्यरत असतात. त्यातही दोन ते तीन प्रोबिशनल पिरेडवर असल्याने उर्वरीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडतो. त्यामुळे या ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. 

 ‘ते’ कर्मचारी वर्षानुवर्षे रामनगर ठाण्यातच- सर्वसाधारपणे एका ठाण्यात ठाणेदार दोन ते अडीच वर्षांचा कार्यकाळ काढत असताना दिसून येतात. परंतु, मागील काही महिन्यात रामनगर ठाण्यातील चित्र बघितले असता केवळ दोन ते तीन महिन्यातच ठाणेदारांची बदली झाली आहे. परंतु, येथील काही कॉन्स्टेबल वर्षानुवर्षे याच ठाण्यात काम करताना दिसून येतात. तसेच येणाऱ्या प्रत्येक ठाणेदारांच्या जवळचे व विश्वासातले म्हणून त्यांची ओळख पसरत आहे. ठाणेदार दोन महिन्याला एक बदलत असताना तो कॉन्स्टेबल तेथेच कार्यरत दिसून येतो हे न उलगडणारे कोडेच आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे