बल्लारपूर : तालुक्यातील बामणी, दहेली, दुधोली, कळमना, आमडी, कोरटीमता, पळसगाव, कवळजाई इत्यादी भागातील शेतीला वरदान ठरणार
असलेले वर्धा नदी वरील कळमना-आमडी उपसा
सिंचनाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, विद्युतचे काम
पूर्ण न झालयाने ते कार्यान्वित होऊ शकले नाही.
सुमारे ४० कोटी रूपयांचा हा प्रकल्प बारमाही
वाहणाऱ्या वर्धा नदीवर कळमना गावाजवळ उभा करण्यात आला आहे. या प्रकल्पातून शेतीला पाणी शेतामधून पाईप लाईनही टाकलेल्या आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी याचे काम तत्कालीन अर्थमंत्री व बल्लारपूरचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते भूमिपूजन होऊन सुरू झाले. या प्रकल्पाचे काम वेगाने झाले. मात्र, विद्युुुुतचे काम अजून पूर्ण न झाल्यामुळे ते कार्यान्वित होऊ शकलेे नाही. या प्रकल्पातून आमच्या शेतीला कधी पाणी मिळणार याची प्रतीक्षा या भागातील शेतकऱ्यांना आहे.
हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा शेतीसाठी होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. याकडे संबंधितांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.
- ॲड. हरिश गेडाम,
सदस्य, जिल्हा परिषद, बामणी - पळसगाव क्षेत्र.