गेल्या काही दिवसांपासून धानापूर येथील तलाठी खांडरे यांच्याविरुद्ध सततच्या तक्रारी करून कारवाईची मागणी करंजी येथील कमलेश निमगडे याने विविध पदाधिकाऱ्यांना घेऊन केली होती. निवेदनामध्ये स्वत:ला राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचा उल्लेखही करीत होता. अशातच तलाठी खांडरे व कमलेश निमगडे यांच्यात तडजोडीदरम्यान बदनामी व तक्रारी रोखण्यासाठी काल २० हजार रुपये देण्याचे ठरले. तत्पूर्वी तलाठी खांडरे यांनी कमलेश निमगडे याच्याविरुद्ध आर्थिक मागणीबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. तहसील कार्यालय परिसरात गुरुवारी २० हजारांची लाच घेताना कमलेश निमगडे याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध गोंडपिपरी पोलीस ठाण्यात येथे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कमलेश निमगडेला आज गोंडपिपरी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. पुढील तपास गोंडपिपरी ठाणेदार संदीप धोबे करीत आहेत.
300721\fb_img_1627555366902.jpg
खंडणी प्रकरणातील आरोपी कमलेश निमगडे यांचा फोटो