लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : आनंदवनची कीर्ती जगभरात पोहोचली. वंचित समाजातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याकरिता कर्मयोगी बाबा आमटे यांनी पुढाकार घेतला. त्यातून आनंदवन विद्यालय आकाराला आले. शिक्षण घेवून हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्चपदावर कार्यरत आहेत. यंदापासून आनंदवनात इयत्ता ९ वीचा वर्ग सुरू करण्यात आला. आनंदवनातील शैक्षणिक वर्तुळ कर्मयोगी बाबांच्या तिसºया पिढीने पूर्ण केला आहे.कर्मयोगी बाबा आमटे व साधना आमटे यांनी कुष्ठरोगी बांधवांना सोबत घेवून आनंदवनाची स्थापना केली. आनंदवनात कुष्ठरोगी बांधवांसोबत अंध, अपंग स्वत:च्या पायावर उभे राहून समाजात ताठ मानेने जगत आहे. कुष्ठरोगी व दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याचा संकल्प कर्मयोगी बाबांनी पूर्ण केला. आनंदवन विद्यालयातून शिक्षण घेवून शेकडो विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. वरोरा परिसरातील युवकांना चांगले शिक्षण मिळावे, याकरिता आनंदनिकेतन महाविद्यालयाचीही स्थापना केली. अकरावीपासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. तालुक्यात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकºयांना नवीन संशोधन मिळावे, याकरिता आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाची स्थापना केली. जिल्हा परिषदने इयत्ता १ ते ८ वी पर्यंतची शाळा सुरू आहे. आठवीनंतर आनंदवन परिसरातील मुले ९ वी व १० वीच्या शिक्षणाकरिता इतरत्र जात होते. ही बाब बाबांच्या तिसºया पिढीला लक्षात येताच त्याकरिताही पुढाकार घेतला. शैक्षणिक सत्रापासून आनंद विद्यालयाला शासनाने मान्यता दिली. प्रथमच इयत्ता ९ वीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. सेमी इंग्लिश मिडियमध्ये शिक्षण दिले जाणार असून त्याकरिता तज्ज्ञ अध्यापक वर्गही नेमण्यात आला असल्याची माहिती महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी दिली. अंध व अपंग मुक बधीर मुलांकरिता आनंदवनात शाळा आहे. त्यांना दहावीची परीक्षा खासगीरित्या द्यावी लागते. परंतु आता आनंवदनात विद्यालय सुरू झाल्याने त्यांचीही मोठी सोय झाली आहे.
कर्मयोगी बाबा आमटे यांची शैक्षणिक परंपरा तिसऱ्या पिढीनेही जोपासली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:36 PM
आनंदवनची कीर्ती जगभरात पोहोचली. वंचित समाजातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याकरिता कर्मयोगी बाबा आमटे यांनी पुढाकार घेतला. त्यातून आनंदवन विद्यालय आकाराला आले. शिक्षण घेवून हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्चपदावर कार्यरत आहेत.
ठळक मुद्देयंदापासून नववीचे सत्र : आनंदवन विद्यालयाने विद्यार्थ्यांना दिले जगण्याचे बळ