लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : देशभरात ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा नारा दिला जात असताना देशाच्या विविध भागात मुलींवर अत्याचार केला जात आहे. वाढत्या घटनेमुळे समाजमन सुन्न होत आहे. उन्नाव व कठुआ सारख्या घटनेच्या निषेधार्थ बल्लारपूर, विसापूर व भद्रावती येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी सामाजिक व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, महिलांचा, तरुणाचा मोठा सहभाग होता.बल्लारपूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने कठुआ, उन्नाव, सुरत, येथे काळीमा फासणाऱ्या अत्याचारांच्या घटना घडल्या. या घटनेचा निषेध देशभरात केला जात आहे. वारंवार होणाºया घटनेवर प्रतिबंधात्मक उपाय योजना केंद्र सरकारने करावी. पुन्हा निर्भयाचा समाज कंटकाकडून बळी जावू नये, यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून नगरपालिका चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला.यावेळी जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, डॉ. रजनी हजारे, अब्दुल करीम, शिवा राव, नगरसेवक सचिन जाधव, अमित पाझारे, निशांत आत्राम, पवन मेश्राम, मीना बहुरिया, अनिल खरतड, अफसाना सय्यद यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शांती मार्चमध्ये सहभागी झाले होते. यावेळी निषेध सभा घेण्यात आली.विसापूर येथील सामाजिक संघटनेच्या वतीने बुधवारी सायंकाळी ७ वाजता इंदिरानगर वॉर्डातून कँडल मार्च काढून अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मार्लापण करून अभिवादन करण्यात आले. भयमुक्त वातावरण निर्माण करून अत्याचार करणाºयांवर सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सर्व समाज घटकांतील महिला, तरुणांचा, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यकर्त्यांचा यामध्ये सहभाग होता.भद्रावतीत सर्वधर्मीय मोर्चाआयुध निर्माणी (भद्रावती) : येथे जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश (उणीव), गुजरात व महाराष्ट्रातील (वर्धा) येथे झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध करण्यात आला. दरम्यान बलात्कार घटनेतील आरोपींवर तत्काळ कारवाई करुन गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षा देण्यात यावी, तथा गुन्हेगारांच्या समर्थनार्थ मोर्चे काढणाºया लोकप्रतिनिधींवरसुद्धा उचीत कार्यवाहीची करण्याच्या मागणीसाठी सर्वधर्मीय कॅन्डल मार्च काढण्यात आला. स्थानिक नागमंदिराच्या प्रांगणातून कँडल मार्चला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गाने चालत व हातात जळत्या मेणबत्या घेऊन मोर्चेकरी बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ पोहचले. तेथे मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी बलात्कार घटनेमधील मृत मुलींच्या प्रतिमांसमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या मोर्चामध्ये सर्व जातीधर्मातील महिला, मुली, मुले व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कठुआ, उन्नाव घटनेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:16 AM
देशभरात ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा नारा दिला जात असताना देशाच्या विविध भागात मुलींवर अत्याचार केला जात आहे. वाढत्या घटनेमुळे समाजमन सुन्न होत आहे. उन्नाव व कठुआ सारख्या घटनेच्या निषेधार्थ बल्लारपूर, विसापूर व भद्रावती येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला.
ठळक मुद्देबल्लारपूर, विसापूर, भद्रावतीत कॅन्डल मार्च : सामाजिक व राजकीय संघटनांचा पुढाकार