लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी बँकांना भरीव आर्थिक तरतूद देऊन मुद्रा बँक योजनेची सुरुवात केली. मात्र अनेक बँका आपल्या मताप्रमाणे या योजनेची अंमलबजावणी करीत आहे. या योजनेच्या मुळावर उठणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला सहन केले जाणार नाही. मुद्रा लोन द्या, अथवा नका देऊ, मात्र सुशिक्षित बेरोजगार म्हणून कर्ज मागायला येणाºया प्रत्येक तरुणाची नोंद करा, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिलेत.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या खरीप पीक कर्ज वाटप व मुद्रा बँक योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. एन. झा यांच्यासह खासगी व राष्ट्रीयकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. झा यांनी गेल्या तीन वर्षात मुद्रा बँक योजनेमध्ये जिल्ह्यातील सर्व बँकांनी मिळून वाटप केलेल्या कर्जाचा अहवाल सादर केला. यामध्ये २०१६-१७ या कालावधीत १३० कोटी, २०१७-१८ या वर्षात १६० कोटी तर २०१८-१९ या वर्षात १५ जूनपर्यंत ३३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे स्पष्ट केले. यावेळी बँकनिहाय आढावा ना. अहीर यांनी घेतला.काही राष्ट्रीयकृत बँकांनी अत्यल्प असे कर्ज वाटप केले असून खातेदारांची संख्यादेखील कमी असल्याचे निदर्शनात आल्यानंतर त्यांनी या बँकांनी राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे अथवा जिल्ह्यातील गाशा गुंडाळण्यास त्यांना सांगण्यात येईल, अशा शब्दात ना. अहीर यांनी त्यांना स्पष्ट समज दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक युवकांची त्याला कर्ज मिळो अथवा न मिळो, परंतु बँकेमध्ये नोंद घेतली गेली पाहिजे, असे स्पष्ट केले.यासाठी जिल्हा ग्रहणी बँकेचे व्यवस्थापक यांनी सर्वांसाठी एक आदेश जारी करावा, असे स्पष्ट करण्यात आले.नव्या खातेदारांनाही कर्ज द्याया बैठकीत सदस्यांनी नियमित खाते असणाऱ्या खातेधारकांनाच मुद्रा बँकेचे कर्ज दिले जात असल्याबद्दल आक्षेप घेतला. नव्या लोकांनादेखील बँकेकडून कर्ज दिले गेले पाहिजे. मुळात ही योजना नवे व्यावसायिक तयार करणारी असून त्यासाठी बँकांनी पुढे यावे, असे ना. अहीर यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रमुख बँक असणाºया स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ब्रह्मपुरी, सिंदेवाही शाखांमध्ये जिल्हा परिषदेच्या योजनांबाबत नकारात्मक भूमिका घेतल्याची तक्रार यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केली. या बैठकीमध्ये उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यासाठी समज देण्यात आली. मुद्रा बँक योजना नवीन व्यावसायिक तयार करणारी योजना असून बँक यामध्ये केवळ माध्यम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी पुरेशी तरतूद केली असून बँकांनी यामध्ये अडथळा न आणता सुलभतेने सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही ते म्हणाले.
मुद्रा लोनसाठी येणाऱ्या बेरोजगाराची नोंद ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:04 PM
केंद्र शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी बँकांना भरीव आर्थिक तरतूद देऊन मुद्रा बँक योजनेची सुरुवात केली. मात्र अनेक बँका आपल्या मताप्रमाणे या योजनेची अंमलबजावणी करीत आहे. या योजनेच्या मुळावर उठणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला सहन केले जाणार नाही. मुद्रा लोन द्या, अथवा नका देऊ, मात्र सुशिक्षित बेरोजगार म्हणून कर्ज मागायला येणाºया प्रत्येक तरुणाची नोंद करा, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिलेत.
ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे बँकांना निर्देश : प्रत्येक बँकांनी शंभर लोकांना कर्ज वाटप करावे