लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : केरोसीन विक्रेत्यांना अगोदर शासनाने २० हजार रुपयांचे मासिक मानधन लागू करावे व अन्य मागण्यांकरिता शुक्रवारी सकाळपासून शिवाजी चौकात केरोसीन हॉकर्स रिटेलर्स फेडरेशनतर्फे आमरण उपोषण सुरू केले आहे.केरोसीन विक्रेत्यांचा केरोसीन मासिक कोटा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे केरोसीनचे वाटप कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा शासनाने विचार न करता १ आॅगस्ट २०१८ ला नवीन आदेश काढले. त्या आदेशानुसार केरोसीन विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने १ आॅगस्ट २०१८ चा आदेश लावण्यापूर्वी २० हजार रुपये मासिक मानधन लागू करावे. तरच आदेशाचे पालन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. परवानाधारकांना हमीपत्र मागण्याची घाई करून त्रास देऊ नये, संबंधित काम अधिकारी व कर्मचारी यांचे असून परवानाधारकांचे नाही. त्यामुळे परवानाधारक कार्डधारकाकडून हमीपत्र मागू शकत नाही, असेही फेडरेशनने म्हटले आहे.
केरोसीन हॉकर्स फेडरेशनचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 10:45 PM