राजुरा : खामोना ग्रामपंचायतने प्रथमच कचरा संकलन करण्यासाठी ई-रिक्षा खरेदी केला आहे. या माध्यमातून खामोना व माथरा या दोन गावच्या कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे.
ई-रिक्षातून कचरा संकलन करणारी खामोना ग्रामपंचायत राजुरा तालुक्यात पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. खामोना ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगांतर्गत ई-रिक्षा खरेदी केला आहे. यातून दोन गावाच्या कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यात येणार आहे. कचरा संकलनामुळे गावाची स्वच्छता होणार आहे. नुकताच या वाहनांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात ग्रामसेवक मिलिंद देवगडे यांची प्रशासकीय बदली झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच हरिदास झाडे, उपसरपंच शारदा तालांडे, पोलीस पाटील विजय पदे, ग्रामपंचायत सदस्य मारोती चन्ने, सोनी ठाक, लक्ष्मी लोणारे, ग्रामविकास समिती दिलीप गिरसावडे, जयश्री पावडे, आशावर्कर सविता उरकुडे, दौलत लोणारे, बाबूराव चन्ने, नंदू बुतले, आशिष मोरे, दीपक पिंपळकर, विकास पावडे, नवनाथ मिलमिले हजर होते. याच कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रिंटर, साऊंड सिस्टीम व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले. सोबतच अंगणवाडी केंद्राला आलमारी व टेबल देण्यात आले.
250921\img-20210924-wa0311.jpg
फोटो