लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील राजे खांडक्या बल्लाळशहा व राजे नीळकंठशहा यांची समाधी दुर्लक्षित होती. परिणामी त्या समाधीवर झाडे-झुडपे वाढले होते. त्यामुळे इको-प्रो टीमकडून त्या दोन्ही समाधीची स्वच्छता करण्यात आली आहे. आता या दोन राजांच्या समाधीचे पुर्ववत सौंदर्य परत बघायला मिळत आहे.इको-प्रो संस्थेच्या वतीने चंद्रपुरातील किल्ला-परकोट स्वच्छता अभियान मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. चंद्रपूरचा किल्ला-परकोट जवळपास १० ते ११ कि.मी. लांब असून गोंड राज्याच्या सहा पिढिनी शंभर वर्षात बांधून घेतला. चंद्रपूर राज्याची निर्मिती आणि परकोटाची पायाभरणी करणारे राजे खांडक्या बल्लाळशहा आणि चंद्रपूर येथील शेवटचे गोंडराजे ज्याच्या कार्यकाळात गोंड राज्य भोसलेच्या ताब्यात गेले. आणि राजे नीळकंठशहा यांना बल्लारपूर किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले. पुढे त्यांचा मृत्यु झाला. अशा दोन्ही गोंडराजे व खांडक्या बल्लाळशहा यांची राणी हिताराणी यांच्या समाधी बल्लारपूर-बामणी रोडवर पेट्रोलपंपच्या मागे असून सदर वास्तूची अवस्था ठीक नसल्याने, झाडी-झुडपे, वृक्ष-वेली अगदी वरपर्यंत वाढलेली होत्या. संस्थेतर्फे किल्ला स्वच्छता अभियान सुरु असल्याने बºयाच नागरिकांनी चंद्रपूर वसविणारे राजे खंडाक्या बल्लाळशहा यांचे समाधीच्या दुरवस्थेबाबत माहिती दिली. त्यामुळे रविवारी संस्थेच्या सदस्यांनी श्रमदान करुन किल्ल्याची स्वच्छता केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात इको-प्रो पुरातत्व संवर्धन समिती प्रमुख रवी गुरनुले, नितिन बुरडकर, धर्मेद्र लुनावत, संजय सब्बनवार, राजू कहिलकार, बिमल शहा, अनिल अड्डवार, सुमित कोहले, हरीश मेश्राम, राहुल कुचनकर, वैभव मडावी, सचिन धोतरे, नीलेश मडावी, राजेश व्यास, अमोल उत्तलवार, सुधीर देव, सूरज गुंडावार, अभय अमृतकर, सौरभ शेटे, जयेश बैनलवार, कपील चौधरी, अतुल राखुंडे, हरीश मेश्राम, प्रतिक बद्दलवार, सुनील पाटील, आकाश घोड़मारे, दिवाकर प्रजापती आदी सहभागी झालेले होते. यावेळी बल्लारपुरातील पर्यावरण वाहिणीचे शरीफ त्यांचे सहकारी, चंद्रपूच्या नगरसेविका शीतल कुळमेथे, संतोष आत्राम यांनी भेट दिली व श्रमदानात सहभागी झाले.समाधींची पुरातत्व विभागाकडे नोंदच नाहीसदर गोंडराजे यांच्या समाधींची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे अजूनही नोंद नसल्याने याकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. राजे खांडक्या बल्लाळशहा, राणी हितारानी व राजे नीळकंठशहा यांचे समाधीची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने त्वरित नोंद करुन या समाधीची देखभाल व देखरेख करुन आवश्यक डागडुजी करावी, अशी मागणी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे.
खांडक्या बल्लाळशहा राजाच्या समाधीची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:54 PM
येथील राजे खांडक्या बल्लाळशहा व राजे नीळकंठशहा यांची समाधी दुर्लक्षित होती.
ठळक मुद्देइको-प्रोचा पुढाकार : राजे नीलकंठशहाची समाधीही स्वच्छ