सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु, दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. त्यापैकी काहींना विविध प्रकाराची लक्षणे जाणवत आहेत. बाधित असताना रुग्णांवर झालेल्या औषधोपचारामुळे किंवा अधिक प्रमाणात झालेल्या स्टेराॅईडमुळे, रेमडेसिव्हिरमुळे तसेच म्युकरमायकोसिसवर करण्यात येणाऱ्या उपचारामुळे अनेकांच्या किडनीवर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. जागतिक लोकसंख्येपैकी १० टक्के लोक किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. दिवसेंदिवस हा आजार वाढीस लागला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.
बॉक्स
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे अशा रुग्णांना कोरोना होण्याची शक्यता लवकर असते. त्यामुळे अशा रुग्णाला लक्षणे आढळताच तपासणी करावी. उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आपणाला किडनीचा आजार असल्याची माहिती द्यावी. त्यानुसार औषधांचा डोस कमी करता येतो.
-------
हे करा
नियमित व्यायाम करावा, संतुलित आहार घ्यावा,
किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाने मांस-मटण खाण्याचे प्रमाण कमी करावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित उपचार घ्यावा. नेहमी मास्क वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. गरज असेल तर घराबाहेर पडावे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे.
------
फॅमिली डॉक्टरांशी बोलनूच घ्या स्टेरॉईड
किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाने नियमित औषधोपचार घेणे गरजेचे असते. अन्यथा किडनी फेल होण्याची शक्यता असते. जर बाधिताला स्टेरॉईड घेण्याची गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच स्टेरॉईड घ्यावे, अन्यथा किडनीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट
कोरोनाचा किडनीवर थेट परिणाम होत नसला तरी, रेडमेसिव्हिर, म्युकरमायकोसिसच्या औषधांमुळे तसेच स्टेरॉईडच्या अधिक वापरामुळे रुग्णांना किडनीचा त्रास होऊ शकतो. परंतु, वेळीच व योग्य उपचार घेतल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. जर रुग्ण किडनीने आजाराने त्रस्त असेल तर त्याचा डोस कमी करणे गरजेचे असते. नाही तर त्याच्या किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते.
-डॉ. अभिषेक दीक्षित, किडनी तज्ज्ञ, चंद्रपूर