देवाडा :राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी पेसा ग्रामपंचायत देवाडा येथील पथदिव्यांच्या वीज बिलाची रक्कम भरणा न केल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गावातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य आहे.
वीज बिलाचे अंदाजे १९ लाख रुपये थकित आहेत. परिसरात देवाडा हे गाव मोठे असल्याने परिसरातील काही नागरिकांना व्यापार करण्यासाठी तसेच बँकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, शाळेत, खासगी दवाखान्यात पशुवैद्यकीय दवाखान्यात, आयटीआय, आठवडे बाजारात विक्रीसाठी व शेतीचे दिवस असल्याने कृषी केंद्र येथे यावे लागते, पावसाळ्याचे दिवस असल्याने एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे अंधाराचे साम्राज्य. यामुळे जीव धोक्यात आला आहे. जिल्हा परिषदेने व ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन गावातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
260821\1348-img-20210826-wa0011.jpg
देवाडा गावामध्ये अंधाराचा साम्राज्य ,विधुत पुरवठा बंद करताना फोटो