देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा येथील सजामध्ये सात ते आठ गावे येतात. मात्र येथील तलाठी कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य असून, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भावही आहे. मात्र याकडे संबंधिताचे दुर्लक्ष झाले आहे. येथील तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने अनेकवेळा सामान्य नागरिकांना राजुरा येथे कामासाठी जावे लागते. त्यामुळे मुख्यालयी राहण्याच्या सूचना देऊन येथील कार्यालय परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे, साजाअंतर्गत येणारी गावे सात ते दहा किलोमीटर अंतरावर आहेत. मात्र तलाठी भेटतच नसल्याने अनेकवेळा अडचणीचा सामना करावा लागत आहे, यासंदर्भात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र अल्पसंख्याक अध्यक्ष अब्दुल जमीर अब्दुल हमीद यांनीही अनेकवेळा विचारणा केली आहे. मात्र उडवाउडवीची उत्तर देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.