आधीच कोरोनाचा मार नागरिक मागील दोन वर्षांपासून सोसत आहेत. त्यात नुकतीच डेंग्यूची साथ सुरू आहे. शहरात मांस खणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. अशा परिस्थितीत मटण मार्केटमध्ये असणारी घाण परत रोगराईला निमंत्रण देण्यासारखे आहे. नगर परिषदेच्या अगदी बाजूला बचत भवन आहे. त्याच्याच अगदी बाजूला मटण मार्केट भरते. तरीही या ठिकाणी नेहमीच घाण पसरलेली असते. कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. निर्बंधांत आता शिथिलता मिळाली आहे; परंतु पावसाळ्यात डेंग्यूसह अनेक आजार झपाट्याने पसरतात. या मार्केटमध्ये गर्दी असते. सर्वत्र घाण पसरल्याने विक्रेत्यासोबतच मांस विकत घेण्याऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या मार्केटमध्ये नगरपालिकांकडून रोज साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी येथील मांस विक्रेते करीत आहेत.
310721\20210730_173856.jpg
बल्लारपुरातील मटण मार्केट मध्ये घाणीचे साम्राज्य