तळोधी बा : नागभीड तालुक्यात येत असलेल्या तळोधी बा. वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी धानाची नासाडी करीत आहेत. त्यामुळे वन विभागाच्यावतीने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गाच्यावतीने केली जात आहे.
या तालुक्यात २५८०० हेक्टरी क्षेत्रात धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. तसेच धानपिकासोबत तूर व तिळाचीसुध्दा लागवड करण्यात आली असताना, रानटी डुकरांकडून धानाचे तसेच तूर व तीळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांच्यावतीने आपली पिके वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतासभोवताली तारेचे कुंपण व फाटक्या साड्यांचे बुजगावणे लावून वन्यप्राण्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. वन विभागाने जंगलालगतच्या शेत परिसरात काटेरी कुंपण लावावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
020921\img_20210901_155527.jpg
शेतात शेतकऱ्यांच्या वतीने लावले भुंजग