बल्लारपूर : अलीकडे गुरांच्या मालकांनी गुरांना दूध मिळेपर्यंत पोसायचे व नंतर रस्त्यावर मोकाट सोडून द्यायचे, असे चालू केले आहे; यामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला होता. नागरिकांच्या तक्रारींनंतर मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी मोकाट गुरांची धरपकड मोहीम सुरू करून ५० गुरांना कोंडवाड्यात कोंडले आहे.
मोकाट गुरांनी शहरातील रस्त्यांवर ठिय्या मांडणे सुरू केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. अपघातही होत होते. अशात एका बैलाने महिलेला उचलून फेकल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. या समस्येवर नगर परिषदेला निवेदन देण्यात आले. नगर परिषदेने मोकाट गुरांची धरपकड सुरू केली. यापुढे गुरांच्या मालकांनी गुरे जर रस्त्यावर सोडली तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. याशिवाय कोंडवाड्यातील बंदिस्त गुरांना त्यांच्या मालकांनी जर आठ दिवसांत सोडविले नाही तर त्या गुरांना गोशाळेत पाठविण्यात येईल. सध्या रस्त्यावर मोकाट फिरणारी ५० गुरे पकडून नगर परिषदेने कोंडवाड्यात टाकली आहेत; यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
100821\img-20210728-wa0169.jpg
कोंडवाड्यात ठेवलेली मोकाट गुरे