कोरपना : जीवती व तेलंगणा राज्यावरील दुर्गम भागातील जोडणारा कोरपना - खैरगाव - येल्लापूर मार्ग रखडलेलाच आहे.
त्यामुळे नागरिकांना पायदळ प्रवास करावा लागत आहे.
कोरपना ते खैरगाव दोन किलोमीटर पांदण रस्ता, तर सावलहिरा ते येल्लापूर चार किलोमीटरदरम्यान संपूर्ण पहाडी दगडधोंड्यांचा रस्ता आहे. त्यामुळे नागरिकांना थेट प्रवास करण्यास अडचण येत आहे. हा संपूर्ण मार्ग बनवल्यास कोरपना ते गादीगुडा ही दोन्ही शहरे एकमेकांना जोडले जातील. या माध्यमातून अतिदुर्गम भागातील नागरिक मुख्य प्रवाहास जोडले जाऊन आरोग्य, शिक्षण, बाजारपेठ आदी सेवेशी जोडले जातील. तसेच परिसरातील पर्यटनस्थळ असलेल्या शंकर लोधी गुंफा, भीमलकुंड धबधबा येथे जाण्यासाठी पर्यटकांना सोयीचे होईल. त्यामुळे या रस्त्याची निर्मिती होणे अत्यंत गरजेचे आहे.