कोरोना संकटातही सातत्यपूर्ण वीज उत्पादन व पुरवठा करून कर्मचारी खरे ‘कोरोना योद्धा’ ठरले आहेत. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाचे कोविडपासून रक्षण करण्यासाठी मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून ऊर्जानगर वसाहतीत दुसरे लसीकरण केंद्र सुरू केले. कोरोना काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सामजिक कर्तव्य पार पाडले होते. त्यामुळे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. लसीकरण केंद्राच्या उद्घाटनपर कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र रहाटे यांनी केले. या वेळी वैद्यकीय अधीक्षक संगीता बोधलकर व लसीकरण केंद्र प्रमुख वैद्यकीय अधिकारी नीता राठोड, कोरोना लसीकरण टीम प्रमुख अतिरिक्त अभियंता राजकुमार गिमेकर, जयंत देठे, कामगार प्रतिनिधी बबन माहुलीकर, लसीकरण अधिकारी किसन वाघ, गजानन पांडे, जगदेव सपकाल, शत्रुघ्न येरगुडे, रुपेश खोट, हेमंत इटनकर, सोनाली वाघमारे, प्रणव शेंडे, प्रशांत खडतकर, राजू बुटे व अन्य उपस्थित होते. दोन लसीकरण केंद्रांचे व्यवस्थापन करणारे हे विद्युत केंद्र संपूर्ण महाराष्ट्रात पहिले ठरले आहे.
ऊर्जानगर वसाहतीत कोविड लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:34 AM