या लसीबद्दल सर्वांनाच उत्सुकता असली तरी प्रारंभी सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनाच ही लस देण्यात येत आहे. तालुक्यात आतापर्यंत आरोग्यसेवक, शासकीय डाॅक्टर, खासगी दवाखान्यातील डाॅक्टर व त्यांचे मदतनीस, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलातील जवान यांनाच ही लस देण्यात आली आहे.
लसीकरणाची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून, प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. नागभीड तालुक्यात अतिशय नियोजनबद्ध लसीकरणाची ही मोहीम सुरू आहे.
कोट
आतापर्यंत ९२६ व्यक्तींना ही लस देण्यात आली. लसीबद्दल कोणतीही तक्रार आली नाही.
-डाॅ. श्रीकांत कामडी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, नागभीड