नवरगाव : भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा नवरगाव नगरच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारीवर्ग व आशा वर्कर यांचा कोविड योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.
कोविड काळामध्ये सर्व कर्मचारी व आशा वर्कर यांनी सर्वात जास्त योगदान दिले आहे. याची दखल घेत भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोशन मुद्दमवार, नगर अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, मनोहर सहारे, मनीष घुग्घुसकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. महिमा पवार व डॉ. सानिया शेख उपस्थित होते.
120821\img-20210811-wa0008.jpg
कोवीड योध्याचा सत्कार करतांना मान्यवर