लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सावली तालुक्यातील मेटेगाव तलावाची दुरूस्ती तालुका प्रशासनाने थांबविल्यामुळे या परिसरातील शेतकºयांना सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. मेटेगाव, चक मानकापूर, मानकापूर या गावातील कोणत्याही शेतकºयांनी यावर्षी रोवणी केलेली नाही. त्यामुळे शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली असून याकरिता शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी व मेटेगाव तलाव दुरूस्तीचे काम तातडीने करावे, या मागणीसाठी बुधवारी श्रमिक एल्गारच्या वतीने मूल उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.सावली तालुक्यातील मेटेगाव, मानकापूर व चक मानकापूर हे तीनही गाव आदिवासीबहुल गावे आहेत. या गावाला सिंचनाची सुविधा नाही. मात्र मेटेगावला मोठा माजी मालगुजारी तलाव आहे. हा तलाव नादुरूस्त असल्याने या तलावाची दुरूस्ती झाल्यास शेकडो शेतकºयांच्या शेतीला सिंचन सुविधा होवू शकते. सहा महिन्यापूर्वी शासनाने रोहयोतून तलावाचे दुरूस्तीचे काम सुरू केले. मात्र कारणाशिवाय काम बंद करण्यात आले. यावर्षी पाऊस कमी पडल्याने या परिसरातील एकाही शेतकºयाने रोवणी केली नाही. परिणामी गावातील आदिवासी शेतकºयांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्याकरिता तेथील शेतकरी स्थलांतरीत होण्यांच्या मार्गावर आहेत.या शेतकºयांना शासनाने भरपाई द्यावी तसेच मेटेगाव तलावाची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली. या मोर्चात अनिल मडावी, दिनेश घाटे, अशोक दळांजे, प्राजंली दळांजे, मुक्ता गेडाम, लहानु कळाम, अरविंद गेडाम, अमर कड्याम, रवी नैताम, संगिता गेडाम, फरजाना शेख, मोनी कुळमेथे यांनी मार्गदर्शन केले. तर चक मानकापूर, मानकापूर, पेंढरी या तिनही गावातील शेतकरी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाची दखल घेण्याची मागणी आहे.
श्रमिक एल्गारचा मोर्चा धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:20 AM
सावली तालुक्यातील मेटेगाव तलावाची दुरूस्ती तालुका प्रशासनाने थांबविल्यामुळे या परिसरातील शेतकºयांना सिंचनाची कोणतीही सुविधा नाही.
ठळक मुद्देभरपाई देण्याची मागणी : आदिवासी शेतकºयांवर स्थलांतरणाची वेळ