लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीचा हंगाम मोसमी पावसावर अवलंबून आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतो. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का, होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते, आता पीक बहरात आल्यानंतर आकाश निरभ्र असून कडक उन्हात पिके कोमेजली आहे. शेतातील काही पिके नष्टही होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.यावर्षी पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहे. याची सर्वाधिक झळ शेतकरी कुटुंबाला बसली आहे. पावसाअभावी कृषी उत्पादनात घट होण्याचा शक्यता वर्तविला जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यात विपूल निसर्ग संपदा आहे. मात्र जिल्ह्याला वरुणराजाच्या वक्रदृष्टीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाºया जून, जुलै महिन्यातच पावसाने दडी मारली आहे. यामुळे पीक जगवायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकºयांपूढे उभा ठाकला आहे. या गंभीर स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकºयांनी निसर्गाकडे साकडे घातले आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतरही पाऊस न कोसळल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पावसासाठी पूजाअर्चनाही केली जात आहे. जिल्ह्यातील काही गावांत दोन ते तीन दिवसापूर्वी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांना काही प्रमाणात का, होईना संजीवनी मिळाला.निसर्गाने सोडली साथऐन खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतीची बिकट अवस्था झाली आहे. पिकांना पावसाची आवश्यकता असताना पाऊस येत नसल्याने पिके कोमेजून गेली. निसर्गानेही शेतकºयांची साथ सोडल्याने पिके आता जगवायची कशी ? अशी चिंता शेतकºयांना सतावत आहे.नऊ धरणात केवळ १९ टक्के जलसाठाचंद्रपूर: जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार १४० मिमी आहे. मात्र, दोन महिन्यात केवळ २०० मिमी पाऊस जिल्ह्यात झाला. सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाने धरणे, तलावांनी तळ गाठला आहे. नऊ धरणांत केवळ १९.६३ टक्केच जलसाठा आहे. चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाºया इरई धरणात ३३.१२ टक्के, तर मामा तलावात १०.४१ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास पाण्यासाठी धावाधाव होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आसोलामेंढा धरणात (३६.९८ टक्के), घोडाझरी (०.९२), नलेश्वर (२.९१), चंदई (८.५५), चारगाव (२६.५७), अमलनाला (२३.९२), लभानसराड (४८.३५), पकडीगुड्डम (१९.७४), डोंगरगाव (४०.७५), इरई (३३. २२) टक्केच जलसाठा आहे. जिल्ह्यात लघु प्रकल्प ३७, तर मामा तलावांची संख्या ५१ इतकी आहे. यातही फारसा जलसाठा नाही. पावसामुळे धानपट्ट्यात पेरणीची कामे ठप्प पडली आहे. ज्यांनी पेरणी केली. त्यांची पिके आता करपत आहे.जुलै आणि आॅगस्टचा पाऊस महत्त्वाचासाधारणत: जूनमध्ये १५० मिमी, जुलै आणि आॅगस्टमध्ये प्रत्येकी ३५० मिमी पाऊस कोसळतो. जून ते जुलैपर्यंत १३९ मिमी इतकाच पाऊस यावर्षी आला आहे. जुलैमध्ये पावसाची मोठी उघडीपच राहिली. सर्वाधिक पाऊस पडणाºया महिन्यातच पाऊस गायब आहे. यामुळे भविष्यात पडणाºया पावसामुळे धरणे भरणार की, नाही हे सांगणे अवघड झाले आहे. एकूणच जिल्ह्यात विदारक चित्र बघायला मिळत आहे.खरीपाचा हंगाम सुरू झाल्यानंतर अजूनही पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे पावसाअभावी पिके कोमेजायला लागली आहे. पावसाच्या भरवशावर शेती करणाºया सर्वच शेतकºयांची अवस्था बिकट असून शेतकºयांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.-संबाशिव जुनघरी, शेतकरी, गोवरी
पावसाअभावी पिके कोमेजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:51 PM
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीचा हंगाम मोसमी पावसावर अवलंबून आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतो. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का, होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते, आता पीक बहरात आल्यानंतर आकाश निरभ्र असून कडक उन्हात पिके कोमेजली आहे.
ठळक मुद्देदुष्काळी स्थिती : सरासरी उत्पन्नाचीही आशा मावळली